टीम अण्णांविरोधात लोकसभेत ठराव

संसदेतील सर्व राजकीय पक्षाचे सदस्य एकत्र येऊन आज संसदेत टीम अण्णांविरोधात ठराव मांडणार आहेत. टीम अण्णा सदस्यांची वक्तव्ये अपमानास्पद असल्याचं संसद सदस्यांनी म्हटलं आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना एक प्रकारे कोंडीत पकडण्याचा हा डाव असल्याचा आरोप अण्णा समर्थकांतून करण्यात येत आहे.

Updated: Mar 27, 2012, 11:21 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

 

संसदेतील सर्व राजकीय पक्षाचे सदस्य एकत्र येऊन आज संसदेत टीम अण्णांविरोधात ठराव मांडणार आहेत. टीम अण्णा सदस्यांची वक्तव्ये अपमानास्पद असल्याचं संसद सदस्यांनी म्हटलं आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना एक प्रकारे कोंडीत पकडण्याचा हा डाव असल्याचा आरोप अण्णा समर्थकांतून करण्यात येत आहे.

 

 

टीम अण्णाचे सदस्य खासदारांना लुटारू, भ्रष्टाचारी किंवा बलात्कारी म्हणून हिणवत असतील तर ते त्याच खासदारांकडून लोकपाल बिल पास करून घेण्यासाठी प्रयत्न का करत आहेत, असा सवाल विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी केला. खासदारांविरोधात अपशब्द वापरून लोकशाहीचा अपमान करणारी टीम अण्णा हुकूमशाही करत असल्याचा आरोपही स्वराज यांनी केला आहे. खासदारांविरोधात अपशब्द वापरले जात असतील तर संसदेचं रक्षण कोण करणार ?असा प्रश्न जेडीयु नेते शरद यादव यांनी उपस्थित केला आहे.