Mumbai News : मुंबईतील 'या' गर्दीच्या ठिकाणी रहिवासी इमारतीवर कोसळला मेट्रोचा पिलर

Mumbai News : मुंबई शहरात मागील काही वर्षांपासून अनेक ठिकाणी विविध विकासकामं आणि निर्माणाधीन प्रकल्प सुरू असतानाच ही घटना घडली.   

Updated: Jan 31, 2025, 07:17 AM IST
Mumbai News : मुंबईतील 'या' गर्दीच्या ठिकाणी रहिवासी इमारतीवर कोसळला मेट्रोचा पिलर
Mumbai news Under construction metro pillar collapses in chembur residential society building

अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : (Mumbai News) मुंबईला स्मार्ट सिटी करण्याच्या हेतूनं अनेक ठिकाणी विकासकामं आणि निर्माणाधीन प्रकल्पांच्या कामाला वेग आलेला असतानाच अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील चेंबूर इथं मेट्रो ट्रेन ट्रॅकसाठी बांधण्यात येणारा पिलर एका रहिवासी इमारतीवर कोसळला. 

मेट्रो पिलरच बांधकाम सुरू असतानाच ही घटना घडली आणि या भागात एकच भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. जवळपास 20 फूट लांब सळ्या रहिवाशी इमारतीवर कोसळल्या आणि रहिवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x