युपीत विक्रमी संख्येने मुस्लिम आमदार

उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी तब्बल ६३ मुस्लिम उमेदवारांची निवड करत एका नव्या विक्रमाची नोंद केली. यामुळे ४०३ सदस्य संख्या असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेत मुस्लिम आमदारांची संख्या ६३ इतकी झाली आहे.

Updated: Mar 8, 2012, 11:57 AM IST

www.24taas.com, लखनऊ

उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी तब्बल ६३ मुस्लिम उमेदवारांची निवड करत एका नव्या विक्रमाची नोंद केली. यामुळे ४०३ सदस्य संख्या असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेत मुस्लिम आमदारांची संख्या ६३ इतकी झाली आहे.

मागील निवडणुकीपेक्षा ही संख्या सातने जास्त आहे. यापूर्वी सर्वाधिक मुस्लिम आमदारांची संख्या ५६ होती. सर्वात कमी संख्येने मुस्लिम आमदार १९९३ सालच्या निवडणुकीत निवडून गेले होते. रामजन्मभूमी आंदोलनाच्या झंझावात फक्त २५ मुस्लिम उमेदवार निवडणूक जिंकू शकले होते.

यावेळेस समाजवादी पक्षाच्या तिकिटावर ४० मुस्लिम उमेदवारांनी विधानसभा गाठली आहे. तर चौदा जण बहुजन समाजवादी पार्टीच्या तिकिटावर निवडून गेले आहेत. काँग्रेसने मुस्लिम समाजाला १८ टक्के आरक्षण कोट्याचे आश्वासन दिलं असलं तरी फक्त तीनच आमदार काँग्रेस पक्षातर्फे निवडून गेले आहेत. पिस पार्टीच्या तिकिटावर तीन तर कौमी एकता दलाचा एक आणि अपक्ष एक असे मुस्लिम उमेदवार विधानसभेत पोहचले आहेत.