लोकपालवर राज्यसभेत सरकारकडून उत्तर

लोकपाल विधेयकावरची चर्चा राज्यसभेत संपली. विधेयकावरची चर्चा तब्बल बारा तास चालली. सरकारकडून उत्तराला सुरवात झाली आहे. लोकपाल विरोधकांवर नारायण सामींनी टीका केली.

Updated: Dec 30, 2011, 07:35 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

लोकपाल विधेयकावरची चर्चा राज्यसभेत संपली. विधेयकावरची चर्चा तब्बल बारा तास चालली. सरकारकडून उत्तराला सुरवात झाली आहे. लोकपाल विरोधकांवर नारायण सामींनी टीका केली.

राष्ट्रीय जनता दलाचे खासदारांनी गोंधळ घातला. लोकपाल विधेयक कमकुवत आहे हे म्हणणं चुकीचं असल्याचं सामी म्हणाले. सीबीआय आणि मुस्लिम आरक्षणावरचा आक्षेप चुकीचा असल्याचंही सामी म्हणाले.  नारायण सामींच्या भाषणात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अडथळे आणले. जनता दलाचे खासदार राजनीती प्रसाद यांनी  विधेयकाची प्रत सभागृहात फाडली. चर्चा संपली असली तरी विधेयकाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

Tags: