लालूजींना राष्ट्रीय व्यक्तीमत्व घोषित करा- शत्रुघ्न

लालू प्रसाद यादव यांना राष्ट्रीय व्यक्तीमत्व म्हणून घोषित करण्यात यावं अशी मागणी लोकसभेत सिनेस्टार आणि भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केली. सिन्हा यांनी ही मागणी करताच लोकसभा सदस्यांनी बाकं जोर जोरात वाजवली आणि सभागृहात हास्यस्फोट झाला.

Updated: Dec 29, 2011, 10:46 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

 

लालू प्रसाद यादव यांना राष्ट्रीय व्यक्तीमत्व म्हणून घोषित  करण्यात यावं अशी मागणी लोकसभेत सिनेस्टार आणि  भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केली. सिन्हा यांनी ही  मागणी करताच लोकसभा सदस्यांनी बाकं जोर जोरात  वाजवली आणि सभागृहात हास्यस्फोट झाला. लालू प्रसाद  यादवांची अफाट लोकप्रियता पाहता मी नम्रपणे पंतप्रधानांना विनंती करतो की लालूजींना राष्ट्रीय व्यक्तीमत्व म्हणून घोषित करण्यात यावं.

 

देशाचा राष्ट्रीय पक्ष मोर आहे त्याच धर्तीवर लालूजींना राष्ट्रीय व्यक्तीमत्व म्हणून घोषित करावं असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. लालू प्रसादांनी त्यांना या अचाट मागणीसाठी सलाम केला आणि पंतप्रधान मनमोहन सिंग आणि युपीए अध्यक्षा सोनिया गांधींना देखील हासू आवरलं नाही. सिन्हा यांनी आपल्या भाषणाची अखेर करताना भोजपूरीचा समावेश राष्ट्रीय भाषांच्या यादीत अशी मागणी केली. भाषणाच्या दरम्यान सिन्हा काही काळ भोजपूरीत बोलले.