शिवाजी महाराजांची स्वारी एव्हरेस्टवर

महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी अभूतपूर्व घटना नुकतीच हिमालयातील माऊंट एव्हरेस्टच्या पायथ्याशी असलेल्या गोरक्षेप (उंची १७000 फूट) या ठिकाणी घडली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांनी एव्हरेस्ट सर केले. यासाठी पुणे करांनी पुढाकार घेतल्याने ते शक्य झाले.

Updated: Apr 23, 2012, 11:35 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

 

महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी अभूतपूर्व घटना नुकतीच हिमालयातील माऊंट एव्हरेस्टच्या पायथ्याशी असलेल्या गोरक्षेप (उंची १७000 फूट) या ठिकाणी घडली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांनी एव्हरेस्ट सर केले. यासाठी पुणे करांनी पुढाकार घेतल्याने ते शक्य झाले.

 

 

‘माऊंट एव्हरेस्ट’च्या मोहिमेसाठी निघालेल्या पुण्यातील गिरीप्रेमींच्या गिर्यारोहकांनी नेपाळमध्ये एव्हरेस्टच्या पायथ्याजवळ असणार्‍या गोरक्षेप येथे चार फूट उंचीच्या मोठय़ा दगडांनी तयार केलेल्या चौथर्‍यावर  छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीष पुतळ्याची प्रतिष्ठापना केली  आहे.  शिवाजी महाराजांच्या नावाने स्थानिक शेर्पांसाठी सामाजीक प्रकल्प चालू केला. रविवारी २२ एप्रिल २०१२ रोजी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रतिष्ठापना  सोहळा पार पडला. हा शिवाजीमहाराजांचा पुतळा बसविला असून, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शानाखाली पुण्यातील प्रसिद्ध मूर्तीकार दिनकर थोपटे, दीपक थोपटे यांनी हा पुतळा तयार केला आहे.  पुतळ्याच्या निर्मितीसाठी व त्याच्या प्रतिष्ठापनेसाठी पुरंदरे यांनी १ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.

 

 

एव्हरेस्ट बेसकॅपकडे जाताना वाटेत लागणारे गोरक्षेप हे शेवटचे गाव असून येथून एव्हरेस्ट, नुपत्से, पुमोरी, चांगत्से अशा उत्तुंग शिखरांचे दर्शन होते. गोरक्षेप येथील हॉटेल हिमालयचे मालक पासांग शेर्पा यांनी आपल्या हॉटेलची जागा या कायमस्वरूपी पुतळ्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. नेपाळमधील एव्हरेस्ट समिटर्स असोसिएशनचे अध्यक्ष वांगचु शेर्पा यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

 

 

व्हिडिओ पाहा...

 

[jwplayer mediaid="87986"]