www.24taas.com, नवी दिल्ली
डिझेलच्या किंमती काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. काही प्रमाणात डिझेल नियंत्रणमुक्त करण्याचे संकेत मुख्य आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांनी दिलेत. डिझेल नियंत्रणमुक्त करणं ही राजकीयदृष्ट्या मोठी संवेदनशील गोष्ट आहे. त्यामुळं काही प्रमाणात नियंत्रण हटवण्याचे संकेत बसू यांनी दिले.
येत्या सहा महिन्यांत मोठ्या आर्थिक सुधारणा होतील असं बसू यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलय. 2014 पर्यंत मोठ्या आर्थिक सुधारणा शक्य नसल्याच्या बसू यांच्या वक्तव्यानं वाद निर्माण झाला होता. रिटेलमधल्या एफडीआयबाबत शंभर टक्के नाही पण काही तरी नक्की होईल असं ते म्हणाले.
शेतकरी आणि छोट्या उत्पादकांसाठी ते महत्त्वाचं आहे. गुंतवणूकदारांचा विश्वासही त्यामुळं वाढेल असं बसू यांनी स्पष्ट केलं.