www.24taas.com, नवी दिल्ली
पेट्रोल दरवाढीवर ममता बॅनर्जींसह विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. दरवाढ करताना सरकारनं आम्हाला विश्वासात घेतलं नाही अस ममता बॅनर्जींनी सांगितलं आहे. युपीए - 2 च्या तिसऱ्या वर्षपूर्तीनंतर लगेचचं पेट्रोलची दरवाढ झाल्यानं विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर सरकारनं जनतेला दिलेलं हे रिटर्न गिफ्ट असल्याची टीकाही विरोधकांनी केली आहे.
पेट्रोल दरवाढीवर ममतांचा भडका
सरकारनं आम्हाला विश्वासात घेतलं नाही, सरकारने विश्वासघात केला आहे,
अस मत ममता बॅनर्जींनी यांनी मांडलं आहे. |
तर सरकारनं यापुढे पेट्रोल डिझेलची दरवाढ होणार नाही असं आश्वासन दिलं होतं मात्र त्यांनी हे आश्वासन पाळलं नाही अशी टीका लालू प्रसाद यादव यांनी केली. तर देशावर आर्थिक संकटाचं वादळ घोंघावत आहे. याला जबाबदार युपीए सरकार असल्याची टीका भाजपनं केली आहे, सामान्य जनतेचा हा विश्वासघात असल्याचंही भाजपनं म्हटलं आहे. पेट्रोल दरवाढीच्या निर्णयावर विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
इंधन दरवाढीचा निर्णय दुर्देवी असल्याचं तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी म्हटलं. भाजपनेही सरकारवर तोफ डागली. सरकारकडे पेट्रोल दरवाढीचे धोरण नसल्याचं माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी म्हटलं.