डिझेल-एलपीजीमध्येही भाववाढ होणार?

पेट्रोलचा धक्का कमी की काय पण त्यापाठोपाठ आता डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमतीही महागण्याची शक्यता आहे. शुक्रवारी केंद्रीय मंत्रिगटाची याबाबत महत्त्वपूर्ण बैठक होत असून, या बैठकीत सबसिडी कमी करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Updated: May 23, 2012, 09:55 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

पेट्रोलचा धक्का कमी की काय पण त्यापाठोपाठ आता डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमतीही महागण्याची शक्यता आहे. शुक्रवारी केंद्रीय मंत्रिगटाची याबाबत महत्त्वपूर्ण बैठक होत असून, या बैठकीत सबसिडी कमी करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाईचा आणखी भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

 

महागाईच्या भडक्यात नवा पेट्रोल बॉम्ब पडला आहे. पेट्रोलचे दर प्रतिलिटर साडे सात रुपयांनी महाग झाले आहेत. आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची झालेली घसरण, तेलाचे वाढते भाव या साऱ्याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे.

 

एवढ्या मोठ्या पेट्रोल दरवाढीमुळे महागाईत आणखी वाढ होणार, हे वेगळं सांगायला नकोच. यूपीचच्या तिसऱ्या वर्षपूर्तीच्या नंतर आणि संसदेच बजेट सेशन संपल्यानंतर लालगलीच दुसऱ्या दिवशी हा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला आहे. या पेट्रोल दरवाढीमुळं सामान्यांचं जिणं मुश्कील होणार आहे..