दिवसाढवळ्या दुकानात लूट!

औरंगाबादमध्ये मंदिराचा कळस चोरून नेण्याच्या घटनेला १२ तासही उलटले नाहीत तोवर एका व्यापा-याचे दिवसाढवळ्या ११ लाख रुपये लुटून नेल्याची घटना घडली आहे. लागोपाठ चोरीच्या दोन घटना घडल्यानं औरंगाबदच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Updated: Nov 8, 2011, 05:24 AM IST


झी २४ तास वेब टीम, औरंगाबाद

औरंगाबादमध्ये मंदिराचा कळस चोरून नेण्याच्या घटनेला १२ तासही उलटले नाहीत तोवर एका व्यापाऱ्याचे दिवसाढवळ्या ११ लाख रुपये लुटून नेल्याची घटना घडलीय. सेवन व्हील या गजबजलेल्या भागात राजू मणियार हे आपल्या दुकानात बसलेले असताना दोन अज्ञात य़ुवकांनी येऊन त्यांची विचारपूस  केली.  मात्र अचानक या दोघांनी मणियार यांच्यावर झडप घालून त्यांच्या तोंडावर पट्टी बाधून त्यांना खुर्चीला बांधून ठेवले. या परिसरात तुळशीच्या लग्नाची धूम सुरू होती. शिवाय त्यांच्या तोंडाला पट्टी बांधल्यामुळं त्यांना आरडाओरडाही करता आला नाही. त्यामुळं या दोन्ही लुटारूंनी मणियार यांच्या ऑफिसमधून ११ लाखांची रोकड लुटून फरार झाले. यातल्या एकानं हेल्मेट घातलं होतं तर दुस-यांनं तोंडाला रुमाल बांधलेला असल्यामुळं मणियार हे त्यांचा चेहरा पाहू शकले नाहीत. मात्र लागोपाठ धाडसी चोरीच्या दोन घटना घडल्यानं औरंगाबदच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.