नांदेडमध्ये परिक्षा केंद्र नव्हे कोंडवाडा

दहावीचा पहिलाच पेपर परीक्षागृहात नव्हे तर कोंदवाड्यात सोडवण्याची वेळ आज नांदेडमध्ये परीक्षार्थींनी अनुभवली.. परीक्षागृहात क्षमतेपेक्षा जास्त परीक्षार्थी.. पेपर सोडवण्यासाठी बेंचही नसल्याने परीक्षागृहात दाटीवाटीनं बसलेले विद्यार्थी.. अशी सगळी परिस्थिती होती ती महात्मा फुले हायस्कूल या परीक्षाकेंद्रातल्या परीक्षेची..

Updated: Mar 1, 2012, 09:05 PM IST

www.24taas.com, नांदेड

 

दहावीचा पहिलाच पेपर परीक्षागृहात नव्हे तर कोंदवाड्यात सोडवण्याची वेळ आज नांदेडमध्ये परीक्षार्थींनी अनुभवली.. परीक्षागृहात क्षमतेपेक्षा जास्त परीक्षार्थी.. पेपर सोडवण्यासाठी बेंचही नसल्याने परीक्षागृहात दाटीवाटीनं बसलेले विद्यार्थी.. अशी सगळी परिस्थिती होती ती महात्मा फुले हायस्कूल या परीक्षा केंद्रातल्या परीक्षेची..

 

केवळ 250 विद्यार्थी एवढीच शाळेची क्षमता असताना, या केंद्रावर 400 परीक्षार्थींची व्यवस्था बोर्डानं केलीय. याचा फटका परीक्षार्थींना सहन करावा लागला.. वर्गात बेंचेस नसल्यानं, अपु-या प्रकाशात या विद्यार्थ्यांना पेपर सोडवावा लागला.. झी 24 तासनं याबाबत केंद्रप्रमुखांकडे विचारणा केली असता त्यांनी बोर्डाकडे इशारा करत, या प्रकरणातून हात झटकले.. तर शिक्षणअधिका-यांच्या कानावर हा सर्व प्रकार गेल्यानंतर त्यांनी कॅमे-यासमोर तरी उद्यापासून वेगळी व्यवस्था करण्याचं आश्वासन तेवढं दिलंय.