काँग्रेस नेते नारायण राणे यांनी थेट अण्णा हजारे यांना लक्ष बनवत हल्लाबोल केला आहे. राणेंच्या 'प्रहारा'वर अण्णा काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काँग्रेसविरोधात प्रचार करण्यासाठी भाजप तसंच परदेशी एनजीओकडून सुपारी घेतल्याचा आरोप उद्योगमंत्री नारायण राणे यांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थित केला आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगरपालिकेच्या प्रचारसभेत राणे यांनी हा आरोप केला आहे.
राज्यातील नगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. प्रचाराच्या पहिल्याच दिवशीराणे यांनी थेट अण्णा हजारे यांना लक्षबनवत हल्लाबोल केला आहे. काँग्रेसविरोधात अण्णा हजारे यांनी उपोषणाचा हत्यार वापरलं आणि यासाठी परदेशी एनजीओ तसंच भाजपकडून अण्णांनी सुपारी घेतल्याचा गंभीर आरोप राणेंनी केल्याने आता अण्णा-राणे वाद पेटण्याची शक्यता आहे.
कोकणात भास्कर जाधव -राणे वाद पेटला असताना राणेंनी टीका करून अण्णांपुढे दोन हात केले आहेत. त्याआधी राष्ट्रवादी अण्णांवर टीका केली होती. आता काँग्रेसने राणेंना पुढे करत अण्णांवर टीका करण्याची नवी खेळी केली आहे. मात्र राणेंच्या या व्यक्तव्यामुळे नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.