www.24taas.com, नवी मुंबई
नवी मुंबईत सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाच्या महापौरांनी नगरसेवकांच्या मदतीने नालेसफाई करण्यास सुरूवात केली आहे. महापौरांनी ही ध़डक मोहीम सुरू केल्यांन महापालिका प्रशासन अधिकाऱ्यांचं धाबं दणाणलं आहे.
नवी मुंबईतल्या भरलेल्या नाल्यात उतरुन महापौर सागर नाईक आणि त्यांचे २० नगरसेवर नालेसफाई करत होते. वर्षातून तिनदा नालेसफाई करणं, फवारणी करणं खरंतर गरजेचं आहे पण नालेसफाईविषयीच्या वारंवार तक्रारी येऊनही प्रशासन अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत म्हटल्यावर मग महापौरांनीच नालेसफाईला सुरूवात केली. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर वरवरचं काम केलं जातं मात्र त्याचा काही फायदा होत नाही. यामुळे नवी मुंबईकर त्रस्त आहेत.
जर अजुनही प्रशासन अधिकाऱ्यांचे डोळे उघडले नाहीत तर कडक कारवाई केली जाईल असं महापौर सागर नाईक म्हणाले. महापौरांनी आपल्या नगरसेवकांना हाताशी धरुन स्वतः नालेसफाईला सुरूवात केल्याने आता प्रशासन अधिकऱ्यांना जाग येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पण नवी मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी सत्ताधारी आणि प्रशासन अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे हेही दुर्लक्षित करुन चालणार नाही.