उरण खाडीत मृत मासे

उरणमधल्या खाडी किनाऱ्यावर हजारोंच्या संख्येनं कांटा जातीचे मासे मृतावस्थेत आढळले आहेत. उरणजवळीत फुंडे गावाच्या खाडीत हा प्रकार आढळून आला. या खाडीच्या संपूर्ण तीन किलोमीटर परिसरात मृत माशांचा खच पडला. मात्र कशामुळं हे मासे मेलेत हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

Updated: Nov 16, 2011, 03:11 PM IST

झी २४ तास वेब टीम, उरण,

 

उरणमधल्या खाडी किनाऱ्यावर हजारोंच्या संख्येनं कांटा जातीचे मासे मृतावस्थेत आढळले आहेत. उरणजवळीत फुंडे गावाच्या खाडीत हा प्रकार आढळून आला. या खाडीच्या संपूर्ण तीन किलोमीटर परिसरात मृत माशांचा खच पडला. मात्र कशामुळं हे मासे मेलेत हे अजून स्पष्ट झालेलं नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळानं मृत मासे तपासणीसाठी नेले असल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात आलं. सोमवारपासून मासे मृतावस्थेत आढळत असल्याचंही गावकऱ्यांनी सांगितलं.

 

मात्र या अचानक मासे मरण्याने स्थानिक मच्छिमार मात्र चिंताग्रस्त झाले आहेत. आणि म्हणूनच मासे का मृत पडले याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहे. यामुळे तेथील मासेमारी उद्योगधंदा तर संपुष्टात येणार नाही ना अशी भीती आता स्थानिक मच्छिमारांना वाटते आहे.