कल्याण राडा प्रकरणी शिवसेना नगरसेवक अटकेत

कल्याणमध्ये काल शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांत झालेल्या हाणामारी प्रकरणी शिवसेना पुरस्कृत नगरसेवक मोहन उगले यांना अटक करण्यात आली. मनसे नगरसेविकेनं उगलेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना तीन कार्यकर्त्यांसह अटक करण्यात आली.

Updated: Nov 17, 2011, 12:06 PM IST

झी २४ तास वेब टीम, कल्याण

 

कल्याणमध्ये काल शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांत झालेल्या हाणामारी प्रकरणी शिवसेना पुरस्कृत नगरसेवक मोहन उगले यांना अटक करण्यात आली. मनसे नगरसेविकेनं उगलेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना तीन कार्यकर्त्यांसह अटक करण्यात आली. उद्धव ठाकरेंसमोरच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले होते. उद्यानाच्या श्रेयावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत वाद झाल्यानं प्रकरण हाणामारीपर्यंत गेले होते.

 

सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली नंतर प्रकरण हाणामारीपर्यंत गेलं. या प्रकरणी नगरसेवक मोहन उगले यांच्या तीन साथीदारांनी मनसे नगरसेविकेला शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मोहन उगले, आनंद पगारे, स्वप्निल मोरे आणि बंटी यांच्या विरोधात बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. परंतु राडेबाजी करणाऱ्या शिवसैनिकांना अटक केल्यानंतर थोड्याच वेळात मात्र  त्यांना जामिनावर सोडण्यात आलं.