भामटा इन्कमटॅक्स अधिकारी...

अंबर दिव्याची गाडी,इन्कमटॅक्स अधिकारी म्हणून बढतीचा शासनाचा बनावट आदेश,तसच स्वत:चं खोटं ओळखपत्र बनवून भर रस्त्यावर लोकांना थांबवून लूट करणारा ठकसेन इन्कमटॅक्स अधिका-याला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केलीय.

Updated: Jul 13, 2012, 11:11 PM IST

www.24taas.com, चाळीसगाव

 

अंबर दिव्याची गाडी,इन्कमटॅक्स अधिकारी म्हणून बढतीचा शासनाचा बनावट आदेश,तसच स्वत:चं खोटं ओळखपत्र बनवून भर रस्त्यावर लोकांना थांबवून लूट करणारा ठकसेन इन्कमटॅक्स अधिका-याला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केलीय.

 

पाचोरा चाळीसगाव रस्त्यावर नगरदेवळा टोल नाक्याजवळ वाहनधारकांना अडवून तो येणा-या जाणा-या वाहनधारकांना अडवून पैसे वसूल करत असे.मात्र त्याच्या संशयास्पद हालचालींवरून हा बनावट अधिकारी असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना नागरीकांनीच ही खबर दिल्यावरून त्याला अटक केलीय.

 

विश्वास सुभाषचंद्र पाथरेकर असं या बनावट अधिका-याचं नाव असून तो ठाणे जिल्ह्यातील वाशींद गावचा राहणारा आहे.चाळीसगाव पोलिसांनी या ठकसेन अधिका-याकडून इस्टिलो कार,लॅपटॉप,शासनाचा बनावट आदेश ,ओळखपत्र तसच अंबर दिवा जप्त केलाय.