आता अण्णांचं मौन !

शरीरस्वास्थ्यासाठी आणि आत्मशांतीसाठी आठवडाभर मौन पाळण्याचा निर्णय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घेतला आहे.

Updated: Oct 15, 2011, 02:48 PM IST

झी 24 तास वेब टीम, राळेगण

शरीरस्वास्थ्यासाठी आणि आत्मशांतीसाठी आठवडाभर मौन पाळण्याचा निर्णय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घेतला आहे. उद्यापासून त्यांचे हे मौन सुरू होत आहे.

 

[caption id="attachment_2351" align="alignnone" width="300" caption="अण्णा हजारे"][/caption]

हजारे यांचे खासगी सचिव सुरेश पठारे यांनी हजारे यांच्या मौनव्रतासंबंधीची माहिती दिली. अण्णा त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे मौनव्रत धारण करणार आहेत. मौनाच्या काळात ते राळेगण सिद्धी येथेच राहणार आहेत. ते कोणताही दौरा करणार नाहीत. मौनव्रताच्या काळात महत्त्वाचे काम असेल तरच ते लिखित स्वरूपात व्यक्त करतील, असं पठारे यांनी स्पष्ट केलं.