धरणात 'मगर' पण धरणार कोण?

पुण्यात खडकवासला धरणाच्या मुठा कालव्यात सोमवारी संध्याकाळी मगर असल्याचं आढळून आलं आणि एकच गोंधळ उडाला. धरणाच्या भींतीपासून ४०० ते ५०० मीटर अंतरावर ही मगर होती.

Updated: Feb 28, 2012, 10:21 AM IST

www.24taas.com, पुणे

 

पुण्यात खडकवासला धरणाच्या मुठा कालव्यात सोमवारी संध्याकाळी मगर असल्याचं आढळून आलं आणि एकच गोंधळ उडाला. धरणाच्या भींतीपासून ४०० ते ५०० मीटर अंतरावर ही मगर होती. कात्रज सर्पोद्यानातले कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान या मगरीला पकडण्याचा प्रयत्न करत होते. मगरीला पाहण्यासाठी परिसरातल्या नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.

 

मगर एका ठिकाणाहून दुसरीकडे गेली, की गर्दीही इकडून तिकडं जायची. दिसली-दिसली, पकडा-पकडा, पळा-पळा, गेली-गेली अशी धावपळ तब्बल सहा तास सुरू होती. रात्री साडेआठ वाजल्यापासून सुरू असलेलं हे मगर पकडण्याचं नाट्य मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत सुरु होतं. एकानं पाण्यात उडी घेऊन मगर पकडली, मात्र त्याला झटका देऊन मगर निसटून गेली. मगर पकडण्याचं कुठंलंही शास्त्रीय प्रशिक्षण नसल्यामुळं आणि दोन जाळ्यांव्यतिरिक्त इतर कुठलंही साहित्य नसल्यानं मगरीला पकडण्यात अपयश आलं.

 

'झी २४ तास'नं कालच या परिसरातल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना होणाऱ्या मगरींच्या त्रासाबाबतचं वृत्त दाखवलं होतं. वास्तविक मगरीचा विषय हा वनखात्याच्या अखत्यारित येतो. मात्र तक्रार करूनही वनखात्यानं याबाबत काहीच पावलं उचलली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.