www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
पुण्याच्या पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांना हटवण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्यानंतर दादांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त आशीष शर्मांनाही लवकरच घालवण्याचे संकेत दिलेत. नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना जास्त डोक्यावर न घेता डबघाईला आलेल्या पालिकेचा गाडा रुळावर आणला एवढंच नव्हे तर पिपंरी-चिंचवडच्या विकासाला गती देत पालिकेला थेट पंतप्रधानांकडून बक्षीसही मिळवून दिलं.
त्याचेच भांडवल करत थेट उपमुख्यमंत्र्यांपासून महापौरांपर्यंत सर्वांनीच पालिका निवडणुकीत विकास हाच मुद्दा उचलून धरला आणि पंतप्रधानांकडून मिळालेल्या प्रथम क्रमांकाचं भांडवल करत निवडणुकीला सामोरे गेले. राष्ट्रवादीला बहुमत मिळण्यास या कारणाचाही फायदा झाला. पण निवडणुका होताच अजित पवारांनंतर आशीष शर्मांना लवकरच घालवण्याचे संकेत दिलेत. अजित पवारांच्या या भूमिकेवर विरोधकांनी मात्र जोरदार टीका केलीए. तर आयुक्तांनीही यावर काहीही न बोलणं टाळलं.