पिंपरी चिंचवडमध्ये बिल्डरांची चांदी!

पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक भूखंडांचा निवासी वापराला प्रतिबंध करण्याचा प्रस्ताव पालिकेत गुंडाळण्यात आलाय. बिल्डर लॉबीचा दबाव आणि अर्थकारणामुळे प्रस्ताव गुंडाळल्याचा आरोप विरोधकांनी केला. औद्योगिक भूखंडांचा वापर निवासी वापरासाठी करता येणार असल्यानं आता बिल्डरांची चांदी होणार असल्याचं स्पष्ट झालंय.

Updated: Apr 22, 2012, 02:05 PM IST

www.24taas.com,पिंपरी चिंचवड, कैलास पुरी

पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक भूखंडांचा निवासी वापराला प्रतिबंध करण्याचा प्रस्ताव पालिकेत गुंडाळण्यात आलाय. बिल्डर लॉबीचा दबाव आणि अर्थकारणामुळे प्रस्ताव गुंडाळल्याचा आरोप विरोधकांनी केला. औद्योगिक भूखंडांचा वापर निवासी वापरासाठी करता येणार असल्यानं आता बिल्डरांची चांदी होणार असल्याचं स्पष्ट झालंय.

औद्योगिक भूखंडांचा निवासी वापर करण्यासाठी पोलिकेच्या डीपीत अकरा वर्षांपूर्वी बदल करण्यात आला. त्यानुसार संबंधिक विकसकाने पालिकेला दहा टक्के जमीन देण्याचा नियम होता. तसंच जागेपोटी ठरलेल्या दरानुसार अधिमुल्य देणंही गरजेचं होतं. मात्र सतरा विकसकांनी पालिकेला जमीनही दिली नाही. तसंच अधिमुल्याचे तेरा कोटी रूपयेही दिले नाहीत. आणि आता तर औद्योगिक भूखंडांचा निवासी वापर करण्याचा परवानाच बिल्डरांना मिळणार आहे.

बिल्डरांचं कोट कल्याण करणारा हा प्रस्ताव गुंडाळण्यासाठी कांग्रेसही मागे नव्हती. अर्थात अर्थकारण झाल्याचा विरोधकांचा आरोप आघाडीनं फेटाळून लावलाय.

औद्योगिक भूखंड निवासी वापराला देण्याचा 'आघाडीचा उद्योग' बिल्डरांच्या फायद्यासाठी होता हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. मात्र एकहाती सत्ता असल्यानं सत्ताधा-यांना त्याची फिकीरही नाही.