फटाका कारखान्यात स्फोटात ३० जण मृत्यूमुखी पडल्याची भीती

सोलापुरातील सर्वात मोठ्या फटक्याच्या कारखान्यात स्फोट होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच महिला आणि दोन पुरूष ठार झाल्याची घटना घटली. स्फोटानंतर आगीचा भडका उडल्याने कारखान्यात अनेक कामगार अडकल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, फायरब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

Updated: Feb 20, 2012, 11:02 PM IST

www.24taas.com, सोलापूर

 

सोलापूर जिल्ह्यात भाळवणीत सागर फायर वर्क्स या फटक्यांच्या कारखान्यात स्फोट झालाय. या स्फोटात 30 जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येतेय. यामधील 4 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, 11 जण गंभीर जखमी झाले आहेत.

 

या जखमींना सोलापुरातल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलय. हा स्फोट इतका भयंकर होता की, या परिसरातल्या सुमारे एक किलोमीटर परिसरातल्या घरांना तडे गेले आहेत.. तर सुमारे 5 किलोमीटर अंतरावर या स्फोटाचा आवाज ऐकू आला.

 

उन्हात ठेवलेल्या फटाके फुटल्याने कारखान्यात आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय.

 

[jwplayer mediaid="51984"]