मित्राचा खून करणारे 'ते' अल्पवयीन नाहीत

पुण्यात खंडणीसाठी हत्या करण्यात आलेल्या शुभम शिर्केचे मारेकरी अल्पवयीन नसल्याचं निष्पन्न झाल आहे. या प्रकरणी अटक केलेल्या एकाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती तर इतर दोघांना बालसुधारगृहात दाखल करण्यात आलं होतं.

Updated: Apr 10, 2012, 08:13 PM IST

www.24taas.com, पुणे

 

पुण्यात खंडणीसाठी हत्या करण्यात आलेल्या शुभम शिर्केचे मारेकरी अल्पवयीन नसल्याचं निष्पन्न झाल आहे. या प्रकरणी अटक केलेल्या एकाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती तर इतर दोघांना बालसुधारगृहात दाखल करण्यात आलं होतं. गुन्हेगारांना अल्पवयीन ठरवण्याबाबतची वयोमर्यादा कमी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

 

दहावीत शिकलेल्या शुभम शिर्केची ३१ मार्च रोजी हत्या झाली होती. केवळ ५० हजारांच्या खंडणीसाठी त्याच्याच मित्रांनी ही हत्या केली होती. या प्रकरणी अमित नायर या १९ वर्षांच्या आरोपीला अटक करण्यात आली. इतर दोघांनी त्यांच वय १६ असल्याचं सांगितलं. त्यामुळं त्याची रवानगी सुधारगृहात करण्यात आली होती. मात्र दोघांच्या वयाच्या वयाची वैद्यकीय पडताळणी करुन घेतली. त्यानुसार एकाचं वय २१ तर दुसऱ्याचं वय १६ ते १८ असल्याचं निष्पन्न झालं आहे.

 

या गुन्ह्यातल्या आरोपींना अल्पवयीन ठरवत त्यांना दया दाखवू नये अशी मागणी शुभमच्या कुटुंबियांनी केली होती. या आरोपींना परिणामांची कल्पना असताना अतिशय नियोजनपूर्वक हा गुन्हा केला होता. गुन्हा केल्यावर स्व:ताचं वय लपवून कायद्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न गुन्हेगारांकडून केला जातो. अशा परिस्थितीत ही मर्यादा १८  वरुन १६ करण्याची मागणी जोर धरू लागली होती. तारुण्याच्या उंबरठ्यावर मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती बळावत असल्याचं चित्र आहे. त्याला आवर घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे.