आता प्लास्टिक पिशव्या बंद होणार ?

संपूर्ण राज्यात यापुढं प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात येणार आहे. पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबात सुतोवाच केलं आहे.

Updated: Jun 5, 2012, 03:39 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

संपूर्ण राज्यात यापुढं प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात येणार आहे. पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबात सुतोवाच केलं आहे.

 

मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत याबाबत निर्णय घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करणारचं असही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

 

याआधी मुंबईत महापालिकेनं प्लास्टिक बंदी घातली होती. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळं सरकार कधी निर्णय घेणार आणि त्याची अंमलबजावाणी कशी होणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.