काविळीची साथ: उपजिल्हाधिकाऱ्यांसह ११ जणांचा मृत्यू

इचलकरंजी शहरात काविळीची मोठ्या प्रमाणावर लागण झाली आहे. याचा फटका आता गर्भवती महिलांसोबतच शासकीय अधिका-यांनाही बसलाय. काविळीमुळे आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू झालाय. त्यानंतर तरी प्रशासनाला जाग येणार आहे का? असा प्रश्न उपस्थित विचारला जातोय.

Updated: Jun 13, 2012, 08:07 PM IST

www.24taas.com, इचलकरंजी 

इचलकरंजी शहरात काविळीची मोठ्या प्रमाणावर लागण झाली आहे. याचा फटका आता गर्भवती महिलांसोबतच शासकीय अधिका-यांनाही बसलाय. काविळीमुळे आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू झालाय. त्यानंतर तरी प्रशासनाला जाग येणार आहे का? असा प्रश्न उपस्थित विचारला जातोय.

कोल्हापुरातल्या इचलकरंजीत गेल्या दीड महिन्यांपासून काविळीच्या साथीनं प्रचंड थैमान घातलंय. काविळीच्या साथीचा आत्तापर्यंत गर्भवती महिलांसोबतच शासकीय अधिका-यांनाही फटका बसलाय. के. वाय. चव्हाण या इचलकरंजी नगरपालिकेच्या उपमुख्याधिकाऱ्यांचा काविळीमुळे मृत्यू झालाय. तसंच आत्तापर्यंत सुमारे तीन हजार जणांना काविळीची लागण झालीए. मात्र, त्यानंतरही काविळीची लागण झालेल्या लोकांवर उपचार आणि मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा याशिवाय प्रशासनानं दुसरं काहीच केलेलं नाही. पाणी शुद्ध करून दिलं जात असल्याचा दावा जिल्हाधिकाऱ्यांकडून केला जातोय. मात्र, ज्या लोकांच्या उद्योगांमुळे पंचगंगेचं पाणी दूषित होतंय, त्यांच्यावर कारवाई करण्यास ते हतबल आहेत.

एकीकडे आरोग्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी उपाययोजना आणि मदतीची घोषणा केलीए. मात्र त्याची योग्य ती अंमलबजावणी न करता स्थानिक नेते एकमेकांवर आरोप करण्यात मश्गुल आहेत. त्यामुळे काविळीची साथ आटोक्यात येणार तरी कशी? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

.