'आकाश' अयशस्वी ठरण्याची दहा महत्वाची कारणे

आकाश टॅबलेट लवकरच लाँच होणार असली तरी या टॅबच्या कार्यक्षमता आणि टिकाऊपणा बद्दल शंका उपस्थित करण्यात येत आहेत. टॅबमधील तांत्रिक त्रुटी, एकूण किंमत यामुळे या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित उपकरणाविषयी खरेदीदारांचा भ्रमनिरास होण्याची शक्यता अधिक आहे

Updated: Jan 13, 2012, 05:02 PM IST

www.24taas.com, मुंबई

आकाश टॅबलेट लवकरच लाँच होणार असली तरी या टॅबच्या कार्यक्षमता आणि टिकाऊपणा बद्दल शंका उपस्थित करण्यात येत आहेत. टॅबमधील तांत्रिक त्रुटी, एकूण किंमत यामुळे या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित उपकरणाविषयी खरेदीदारांचा भ्रमनिरास होण्याची शक्यता अधिक आहे. आकाशचा विक्रीनंतरचा रिपोर्ट अत्यंत निराशाजनक असाच आहे आणि ज्यांनी ही अत्यल्प किंमतीची टॅबलेट विकत घेतली त्यांना सुरवातीच्या खास ग्राहकांपैकी एक असल्याचंच समाधान लाभलं आहे.

 

* आकाशच्या लाँचच्या वेळेस मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल म्हणाले होते, की भारतातील शैक्षणिक व्यवस्था सुधारण्यासाठी या टॅबचा चांगला उपयोग होऊ शकेल. देशात प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला ३५ डॉलर इतक्या अत्यल्प किंमतीत कम्प्युटर उपलब्ध करुन देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. या टॅबमुळे शैक्षणिक दर्जात सुधारणा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

 

* शालेय विद्यार्थ्यांना सहाय्य करणारं उपयुक्त उपकरण तसंच शैक्षणिक दर्जा सुधारणा हा आकाश टॅबचा प्रमुख उद्देश आहे. पण ज्या उद्देशाने आकाश टॅब उपलब्ध करुन देण्यात आला तो तरी सफल होईल का याबद्दल शंका उपस्थित करण्यात येत आहे. आकाश टॅबच्या संदर्भातील नकारात्मक प्रतिक्रिया उमटत असतानाही त्याची निर्मिती करणाऱ्या डाटाविंड कंपनीने त्याचे पुढील वर्जन युबीस्लेट लाँचसाठी सिध्द केलं आहे. युबीस्लेटमध्ये आकाशच्या तुलनेत अधिक चांगले फीचर्स आहेत. नवं वर्जन हे चिनी बनावटीशी साधर्म्य असणारं असेल आणि त्याला सीम कार्डचा पर्याय असेल असं तज्ञांचा अंदाज आहे. आकाश अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे असा विचार करणाऱ्यांसाठी ही काही आकडेवारी.

* टॅबलेटची किंमत- २५०० रुपये

* पाठवणीचा खर्च- २०० रुपये

* ४ जीबी किंवा ८ जीबी मायक्रोएसडी कार्डची किंमत साधारणत: ५०० ते ८०० रुपये

* किमान एका इयरफोनची किंमत- ४०० रुपये

 

आकाश अयशस्वी होण्याच्या दहा गोष्टी 

1) खराब प्रोसेसरमुळे टॅब अनेक प्रकारची कार्य पूर्ण क्षमतेने करु शकणार नाही. एण्ड्रोईड ओएस ऍप्लिकेशनला पुरेशी मेमरी असल्याशिवाय ऍप्लिकेशन्स आणि ग्राफिक्सचा वापर करता येणार नाही. बाजारात सध्या सगळ्यात स्वस्तात उपलब्ध असलेलेल स्पाईस कंपनीचे ऍण्ड्रोईड मोबाईल्स ६०० मेगाहर्ट्झ प्रोसेसरवर चालतात तर आकाशमध्ये फ्कत ३३६ मेगाहर्टझचा प्रोसेसर बसवण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा उपयोग फक्त ओएससाठी होऊ शकेल आणि एकावेळी अनेक ऍप्लिकेशन वापरता येणार नाहीत, असं मत या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केलं आहे.

 

२)आकाश टॅबलेट हेवी म्हणजेच जड फाईल्स आणि भरपूर गाणी साठवू शकणार नाही.  त्यात व्हिडीओ साठवण्याची क्षमता कमी आहे. टॅबलेटच्या मेमरीचा विस्तार ३२ जीबी पर्यंत करता येणार असला तरी त्यासाठी ८ जीबीच्या मायक्रोएसडीला जास्त पैसे मोजावे लागतील. या कार्डची किंमत ८०० ते १००० रुपयांच्या दरम्यान आहे आणि त्यामुळे सरकारने निश्चित केलेल्या २५०० रुपयांपेक्षा जास्त पैसे ग्राहकाला खर्च करावे लागतील.

 

३ )आकाशला शक्तीशाली बॅटरीचा बॅकअप देण्यात आलेला नसल्याचं तज्ञांचे म्हणणं आहे. आकाश सारख्या तुलनेने मोठं स्क्रीन असलेल्या गॅझेटला जास्त काळ चालणाऱ्या बॅटरीची गरज आहे. बाजारात स्वस्तात उपलब्ध असलेल्या ऍण्ड्रोईड फोनमध्ये  १५०० एमएएच बॅटरी बसवण्यात आली आहे. या फोनचा स्क्रीन फक्त ३ ते ३.५ इंच इतका आहे. आकाशची निर्मिती करणाऱ्या डाटाविंडने १८० मिनिटांचा पॉवर बॅकअप असल्याचा दावा केला असला तरी त्याचा कशासाठी उपयोग होऊ शकेल याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. टॅबमधील कमी क्षमतेच्या प्रोसेसरमुळे वेब ब्राऊझिंगचा वेग मंदावेल तसंच बॅटरी जास्तीत जास्त तीन तासच चालू शकेल.

 

४) आकाश टॅबलेटचं स्क्रीन रेझोल्युशन कमी दर्जाचं आहे आणि त्यात हाय डेफिनिशन आऊटपूट नाही. त्यामुळे टॅबलेटचा उपयोग बंदिस्त जागेतच करता येईल आणि सूर्यप्रकाशात करता येणार नाही. आकाशच्या टचस्क्रीनचं फिचरही वापरण्यास सहज सुलभ नाही आणि त्यामुळे आयकॉन तसंच इतर ऍप्लिकेशनचं ब्राऊझिंग करणं अडचणीचं ठरेल.

५) आकाशचा प्रोसेसर कमी क्षमतेचा असल्याने मल्टी टास्किंगला लागणाऱ्या वेगामुळे त्यावर ताण पडू शकतो आणि तो लवकर गरम होऊ शकतो. टॅबलेट एक तास सातत्याने वापरल्यास तो तापतो असा अनुभव वाय फ