चार हजारांत टॅबलेट

विशटेल कंपनीने फक्त चार हजार रुपये किंमतीचा टॅबलेट लाँच केला आहे. या टॅबलेटचे नाव आयआरए थिंग टॅबलेट असे आहे. हा अँड्रॉइड २.२ फ्रोयो तसंच लिनक्स शुगर अशा दोन्ही प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टम्सवर रन होईल.

Updated: Mar 23, 2012, 11:21 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

विशटेल कंपनीने फक्त चार हजार रुपये किंमतीचा टॅबलेट लाँच केला आहे. या टॅबलेटचे नाव  आयआरए थिंग टॅबलेट असे आहे. हा अँड्रॉइड २.२ फ्रोयो तसंच लिनक्स शुगर अशा दोन्ही प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टम्सवर रन होईल.

या टॅबलेटमध्ये सात इंचाचा डिस्प्ले, ८०० मेगाहर्ट्झ प्रोसेसर, एक युएसबी पोर्ट, एक मिनी युएसबी पोर्ट, ५१२ एमबी रॅम आणि मेमरी कार्डसाठी एक्स्टर्नल सपोर्ट आहे. तसेच हा टॅबलेट एक्स्टर्नल युएसबी मोडेमला सपोर्ट करेल. टॅबलेटमध्ये बिल्ट इन वाय-फाय  आहे.

याचबरोबर पाच तासांचे बॅकअप असलेली बॅटरी आहे. वाय-फाय आणि थ्री जी मोडवर पाच तासांचे तर व्हिडिओ प्लेबॅक मोडवर तीन तासांचे बॅटरी बॅकअप मिळेल.