मायक्रोसॉफ्टचा ग्राहकांना गोड पर्याय- मँगो

मायक्रोसॉफ्टचा विंडोज फोन ७.५ फोन बाजारात दाखल झाला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार यातल्या नव्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला शेकड्यांनी नव्या फिचर्सचे पर्याय उपलब्ध होणार आहेत.

Updated: Nov 4, 2011, 01:49 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

मायक्रोसॉफ्टचा विंडोज फोन ७.५ फोन बाजारात दाखल झाला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार यातल्या नव्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला शेकड्यांनी नव्या फिचर्सचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे स्पीच रेकगनिशन म्हणजे आवाज ओळखण्याचे फिचर यात अंतर्भूत आहे त्यामुळे टेक्ट किंवा कोणाला फोन करायचा असल्यास तुम्ही तशी कमांड फोनला देऊ शकता. विंडोज फोन ७.५ फोनचे सांकेतिक नाव आहे मँगो. विंडोज फोन ७.५ अतिशय देखणा, क्लासी, वेगवान आहे. या फोनचे डिझाईन क्लीन आणि सहजसुलभ आहे.

 

मायक्रोसॉफ्टने अत्यंत फ्रेश ग्रीड स्पेस आयकॉन्स होम पेजवर उपलब्ध करुन दिले आहेत. होम स्क्रीनवर तुम्हाला दोन कॉलममध्ये रंगीत टाईल्सच्या माध्यमातून सहज संचार करता येणार आहे. ऍप असो कि म्युझिक प्लेलिस्ट किंवा स्पीड डायल एण्ट्री किंवा वेबपेज किंना ईमेल फोल्डरला ऍक्सेस होम पेजवरच्या रंगीत टाईल्सच्या माध्यमातून सहज मिळणार आहे. होमपेजवरील टाईल्सवरील संख्येवरून किती व्हॉईस मेल मेसेज किंवा ईमेल मेसेज किंवा ऍप अपडेटस तुमची प्रतिक्षा करताहेत हे तुम्हाला लगेच समजू शकेल. म्युझिक टाईलच्या माध्यमातून अल्बम आर्ट तर कॅलेंडर टाईलच्या सहाय्याने तुमची पुढील अपाँईटमेंट लगेच कळणार आहे. आणि इतकेच नव्हे तर तुमच्या बहिणीच्या टाईलवरून तुम्हाला लेटेस्ट ट्विटर आणि फेसबुक अपडेट तात्काळ समजू शकेल.

 

विंडोज फोन ७ सॉफ्टवेअरवर आधारीत ऍसर ऍलेग्रो हे मॉडेल डिसेंबरमध्ये लँच करणार आहे आणि त्याची अंदाजे किंमत १८,००० रुपये असेल. तर नोकिया लुमिया ८०० हे मॉडेल देखील डिसेंबर २०११ मध्ये उपलब्ध होईल आणि अंदाजित किंमत असेल २७,०००