रिलायन्सची चहाच्या किंमतीत ब्रॉडबँड सेवा

मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीजची २०१२ च्या अखेरीस टॅबलेट हाय स्पीड डाटा सेवा उपलब्ध करुन देण्याची योजना आहे. रिलायन्स अवघ्या ३५०० रुपयात टॅबलेट लँच करणार आहे आणि त्यासोबत डाटाच्या १ जीबीसाठी दहा रुपये आकारणार आहे.

Updated: Dec 6, 2011, 04:38 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीजची २०१२ च्या अखेरीस टॅबलेट हाय स्पीड डाटा सेवा उपलब्ध करुन देण्याची योजना आहे. रिलायन्स अवघ्या ३५०० रुपयात टॅबलेट लँच करणार आहे आणि त्यासोबत डाटाच्या १ जीबीसाठी दहा रुपये आकारणार आहे. रिलायन्सची सेवा 4 G तंत्रज्ञानावर आधारीत आहे आणि थर्ड जनरेशनच्या तुलनेत अधिक वेगवान असेल. सध्या थर्ड जनरेशनवर आधारीत सेवा उपलब्ध आहेत. आता थर्ड जनरेशनसाठी आकारण्यात येणाऱ्या दरांच्या अवघ्या दहा टक्के किंमतीत सेवा उपलब्ध करुन देण्याची रिलायनसची योजना आहे. सध्या मोबाईल कंपन्या थ्री जी आधारीत १ जीबीच्या सेवांसाठी १०० रुपये दर आकारतात. रिलायन्सच्या प्रवेशाने टाटा टेलिसर्व्हिसेस आणि सिस्टेमा श्याम यासारख्या ऑपरेटर्सना मोठं आव्हान उभं राहणार आहे.

 

संपूर्ण भारताचे पॅन इंडिया लायसन्स असणारी रिलायन्स ही एकमेव कंपनी आहे आणि स्पेक्ट्रमसाठी १३,००० कोटी रुपये या कंपनीने मोजले आहेत. रिलायन्सचे विभाजन होण्या अगोदर टेलिकॉम क्षेत्रात कंपनीने अत्यंत आक्रमक पध्दतीने प्रवेश केला होता. पण त्यावेळेस कंपनीला ४५०० कोटी रुपयांची बिलं ग्राहकांनी थकवल्याने त्यावर पाणी सोडण्याची पाळी आली होती. आता परत त्याची पुनरावृत्ती होई नये यासाठी रिलायन्सचे व्यवस्थापन नव्या व्यवस्थेची रचना करत आहे.

Tags: