गुगल, याहू, फेसबुकला केंद्राची सक्त ताकीद

गुगल, याहू, फेसबुक या साईट्सना केंद्र सरकारने फैलावर घेतले आहे. अक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र टाकण्यावर जोरदार हरकत घेतली आहे.

Updated: Dec 6, 2011, 07:33 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

गुगल, याहू, फेसबुक या साईट्सना केंद्र सरकारने फैलावर घेतले आहे. अक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र टाकण्यावर जोरदार हरकत घेतली आहे.

 

इंटरनेट विश्वातील सोशल नेटवर्किंग साईट्सवर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल अक्षेपार्ह प्रसिद्ध झाल्यामुळे केंद्र सरकारने गुगल, याहू, फेसबुक यांच्याविरुद्ध कडक धोरण अवलंबिण्यास सुरुवात केली आहे.

 

केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी संबंधित कंपन्यांना ताकीद दिली होती. त्यानुसार केंद्र सरकारने गुगल, याहू, मायक्रोसॉफ्टसारख्या इंटरनेट कंपन्या, फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरून मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि मोहम्मद पैगंबर यांच्याशी संबंधित सर्व आक्षेपार्ह गोष्टी हटविण्यास सांगितले आहे. तसेच  साईट्सवर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या मजकुरावर लक्ष ठेवण्यासाठी  यंत्रणा विकसित करण्यास सांगितले आहे.

 

सरकारचा हा प्रस्ताव या सर्व कंपन्यांनी धुडाकावून लावला आहे. कंपन्यांचे म्हणणे आहे, की या सर्व साईट्सवर प्रसिद्ध होणाऱा मजकूर इंटरनेट युजर्सकडूनच येत असतो. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण असते. मात्र, यापुढे काळजी घेण्यात येईल, असे संबंधित कंपन्यांनी म्हटले आहे.