ऑलिम्पिकमध्ये भारताचा पहिला दिवस

बॅडमिंटनच्या मिक्स डबल्सच्या पहिल्याच राऊंडमध्ये ज्वाला गुट्टा आणि व्ही. दिजूला पराभवाचा धक्का सहन करावा लगाला अन् ऑलिम्पिकमध्ये भारताची सुरुवातच पराभवानं झाली. बॉक्सिंगमध्येही भारताची सुरूवात निराशाजनक झाली शिव थापाचं आव्हान पहिल्याच राऊंडमध्ये संपुष्टात आलं, विजेंदरनं मात्र मजबूत दावेदारी प्रस्थापित केलीय. भारतीय आर्चरी टीमही पहिल्याच दिवशी बाहेर पडलीय. तर टेबल टेनिसमध्ये मात्र भारतासाठी पहिला दिवस कही खुशी कही गम असा राहिला.

Updated: Jul 29, 2012, 08:34 AM IST

www.24taas.com, लंडन

बॅडमिंटनच्या मिक्स डबल्सच्या पहिल्याच राऊंडमध्ये ज्वाला गुट्टा आणि व्ही. दिजूला पराभवाचा धक्का सहन करावा लगाला अन् ऑलिम्पिकमध्ये भारताची सुरुवातच पराभवानं झाली. बॉक्सिंगमध्येही भारताची सुरूवात निराशाजनक झाली शिव थापाचं आव्हान पहिल्याच राऊंडमध्ये संपुष्टात आलं, विजेंदरनं मात्र मजबूत दावेदारी प्रस्थापित केलीय. भारतीय आर्चरी टीमही पहिल्याच दिवशी बाहेर पडलीय. तर टेबल टेनिसमध्ये मात्र भारतासाठी पहिला दिवस कही खुशी कही गम असा राहिला.

बॉक्सिंग - विजेंदरची प्री-क्वार्टरमध्ये धडक

भारताचा अव्वल बॉक्सर विजेंदर सिंगनं प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. विजेंदरनं कझाकीस्तानच्या डानबेक सुझानोव्हाला पराभूत करत विजयी सलामी दिली. सुरुवातीपासूनचं विजेंदरनं या मॅचवर आपली पकड मिळवली आणि कझाकच्या बॉक्सरला मॅचमध्ये परतण्याची कुठलीही संधी दिली नाही. ७५ किलो वजनीगटामध्ये त्याची दावेदारी मजबूत आहे आणि त्यानं सुरुवातही धडाक्यात केली आहे. आता प्री-क्वार्टर फायनलचा विजेंदरचा मुकाबला अमेरिकेच्या टेरेल्ल गुआशाशी असेल. हा मुकाबला २ ऑगस्ट रोजी होणार आहे.

बॉक्सिंग – शिव थापाचं आव्हान संपुष्टात

भारताच्या शिवा थापाचं आव्हान ऑलिम्पिकमध्ये पहिल्याच राऊंडमध्ये संपुष्टात आलं. ५६ किलो वजनी गटात शिवा थापाला मेक्सिकोच्या ऑस्कर वेलडेजकडून पराभव स्वीकारावा लागलाय. ऑक्सरने थापाला १४-९ ने पराभूत केलं. या पराभवामुळे शिवा थापाच लंडन ऑलिम्पिकमधील आव्हानच संपुष्टात आलंय. दरम्यान, विजेंदरनंतर शिवा थापाकडून भारताला बॉक्सिंगमध्ये मेडलची सर्वाधिक आशा होती.

बॅडमिंटन - पी. कश्यपची विजयी सलामी

बॅडमिंटनमध्ये पी. कश्यपनं विजयी सलामी दिलीय. त्यानं बेल्जियमच्या टॅन योहानला पराभूत करत पुढच्या राऊंडमध्ये प्रवेश केला. त्यानं योहानचा २१-१४, २१-१२ अशा फरकानं पराभव केलाय. ज्वाला आणि दिजूला पराभव स्वीकारावा लागल्यानं भारतीय चाहते निराश झाले होते. मात्र, कश्यपनं शानदार खेळ करत आपल्या पहिल्याच मॅचमध्ये विजयानं सुरुवात केली.

टेनिस - सानिया-रश्मीनं केली निराशा

टेनिसमध्ये भारताची सुरूवात निराशाजनक झाली. सानिया मिर्झा आणि रश्मी चकवर्ती या जोडीचं विमेन्स डबल्समधील आव्हान संपुष्टात आलंय. पहिल्याच राऊंडमध्ये सानिया-रश्मी जोडीला तैवानच्या सु-वेई सिएह आणि जुंग चुआंग या जोडीकडून पराभव स्वीकारावा लागला. सिएह-जुआंग जोडीने सानिया-रश्मीला ६-१, ३-६, ६-१ नं पराभूत केलं. सानियाचं मिक्स डबल्समधील आव्हान जिंवत असून मिक्स डबल्समध्ये सानिया लिएंडर पेसबरोबर खेळणार आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x