www.24taas.com, मुंबई
क्रिकेट जगतामध्ये केवळ पाच वर्षांमध्येच धोनी टीम इंडियाचा सर्वोत्तम कॅप्टन बनला. भारताला यश मिळवून देण्याची सुरुवात धोनीनं टी-20 वर्ल्ड कपपासून करुन दिली. 2011 मध्ये तब्बल 28 वर्षांननंतर माहीनं टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं. टेस्टमध्ये अव्वल स्थानही भारतीय टीमनं धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये मिळवलं होतं. आता धोनी टेस्टमधून रिटायर होण्याचा विचार करतोयं... खरच धोनी रिटायर होऊन प्रश्न सुटणार आहे का ?
महेंद्रसिंग धोनी टीम इंडियाचा कॅप्टन होण्यापूर्वीची टीम इंडियाची केवीलवाणी अवस्था आठवा. टीम इंडिया पुरती खचली होती, इतकी की, वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्पर्धेत बांग्लादेश सारख्या रँकींगमध्ये खालच्या स्थानावर असणा-या एका टीम कडून बलाढ्य, वर्ल्ड कपची दावेदार असणा-या आपल्या धुरंधरांना पराभव पत्करावा लागला होता... तेव्हा धोनी एक विकेट किपर, बॅटसमन होता. त्याच्या तुफानी बॅटींगची, त्याच्या ताकदीची जोरदार चर्चा होती. आता अनेक माजी क्रिकेटपटूंनी सिनीअर्सना रिटायरमेंटचा सल्ला दिलायं... धोनीमधील कॅप्टन संपला अशी बोंब ठोकलीयं... मात्र वर्ल्ड कपमधील पराभवानंतर अनेक सिनीअर आपली रिटायरमेंट घोषीत करतील अशी अपेक्षा होती, त्यांना तेंव्हा ते जमल नव्हतं, मग आता धोनी आणि कंपनी कडून अपेक्षा का?
मरगळलेल्या टीम इंडियामध्ये जर कोणी प्राण फुंकले असतील तर ते धोनीनं, त्यांना विजयाची चव चाखायची संधी मिळवून दिली असेल तर ती धोनीनं, अर्थात टीम एफर्टमुळेच विजय मिळाले हे नाकारता येणारच नाही. मात्र नेतृत्व तितकच कणखर, प्रयोगशील असाव लागत अन्यथा हाता तोंडाशी आलेला घास टाकणारी टीम इंडिया ही ओळख पुसणं कठीण होतं. आता आपण परदेशात सलग सात टेस्ट पराभव पाहिले, टीका होऊ लागली... सहाजिकच आहे. पण धोनीला इतक डिवचून त्याच खच्चीकरण का? वास्तविक संघाला बळकटी देऊन फिनिक्स प्रमाणे भरारी घेण्याचं धोनीपुढे आव्हान आहे...माहीचा या अवघड परिस्थितीतून कमबॅक करताना पुन्हा एकदा दिग्विजयासाठी सज्ज होईल....