बेड मिळत नाही म्हणून आंदोलन करणाऱ्या कोरोना ग्रस्ताचा अखेर तडफडून अंत...

 कोरोना संसर्गामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. 

Updated: Apr 1, 2021, 03:14 PM IST
बेड मिळत नाही म्हणून आंदोलन करणाऱ्या कोरोना ग्रस्ताचा अखेर तडफडून अंत... title=

 नाशिक : कोरोना संसर्गामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. नाशिकमध्ये उपचाराअभावी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे नाशिकमधील आरोग्य यंत्रणेची लक्तरं वेशीवर टांगली गेली.
 
 नाशिकमध्ये दिवसेंदिवस कोरोना संसर्ग बेफाम वेगाने वाढत आहे. भाऊसाहेब काळे या व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. 
 
 कोरोनाची लागण झाल्यानंतर शहरातील रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्यानं त्यांनी कुटुंबासह संध्याकाळी नाशिक महापालिकेच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता.
 
ऑक्सिजन लेव्हल ३६ असूनही ते बेडसाठी शहरभर फिरले होते. अखेर ऑक्सिजन लावूनच त्यांनी मनपाचं कार्यालय गाठलं. त्यानंतर मनपानं त्यांना बिटको रुग्णालयात दाखल केलं.
 
मात्र तिथंही त्यांना व्हेंटिलेटर मिळू शकला नाही.. आणि आज अखेर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृ्त्यूमुळे राज्यात कोरोना रुग्णांची किती फरफट होत आहे हे लक्षात येतं.