नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान (Prime Minister) देशानाला संबोधित करणार आहेत. मात्र या वेळेसचा स्वातंत्र्य दिन हा नेहमी पेक्षा धमाकेदार असणार आहे. या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेले भारतीय खेळाडू उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे यंदाचा स्वातंत्र्य दिन हा नक्कीच अविस्मरणीय असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narednra Modi) टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या सर्व खेळाडूंना लाल किल्ल्यावर (Red Fort) विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित केलंय. मोदींनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (Prime Minister Narendra Modi will invite the entire Indian Olympics contingent to the Red Fort as special guests on independent day)
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून खेळाडूंसह सपोर्ट आणि कोचिंग स्टाफ असे एकूण 228 जण भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत. या 288 पैकी एकूण 120 खेळाडू आहेत. या सर्व खेळाडूंचं पंतप्रधानांच्या हस्ते 15 ऑग्स्टला सन्मान करणार आहेत. तसेच त्यांच्याशी वैयक्तिक पातळीवर संवादही साधणार आहेत.
पंतप्रधान मोदी नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहित करत असतात. ऑलिम्पिकच्या आधी मोदींनी भारतीय खेळाडूंसोबत संवादही साधला होता. तसेच मोदींनी आज (3 ऑगस्ट) सकाळी भारतीय हॉकी टीमचा सामनाही पाहिला. दुर्देवाने भारताचा या सामन्यात पराभव झाला. मात्र यानंतर पंतप्रधांनांनी ट्विट करत खेळाडूंना प्रोत्साहित केलं.
काय म्हणाले मोदी?
या पराभवानंतर खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्यासाठी पंतप्रधानांनी ट्विट केलं. "जीवनात जय पराजय होतच असतात. भारतीय पुरुष हॉकी संघाने टोक्यो ऑल्मिपिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली, जे महत्त्वाचं आहे. खेळाडूंना आणि टीमला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा, भारताला आपल्या खेळाडूंवर गर्व आहे", असं मोदी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले.
On 15th August, Prime Minister Narendra Modi will invite the entire Indian Olympics contingent to the Red Fort as special guests. He will also personally meet and interact with all of them around that time.#Olympics pic.twitter.com/Sw0rbENdVb
— ANI (@ANI) August 3, 2021
टोक्यो ऑलिम्पिकमधील भारताची कामगिरी
टीम इंडियाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत एकूण 2 पदकांची कमाई केली आहे. मीराबाई चानुने भारताला पहिलं पदक मिळवून दिलं. मीराबाईने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. तर त्यानंतर 'फुलराणी' अर्थात स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने ब्राँझची कमाई केली.