पतीच्या कॅन्सरबद्दल समजताच अशी होती अभिनेत्री अभिज्ञा भावेची अवस्था

 खुलता कळी खुलेना या मालिकेतून घरा-घरात पोहचलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे तिच्या पर्सनल आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिज्ञाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. काही वर्षापुर्वी तिने मेहून पैसोबत लग्नगाठ बांधली. 

Feb 05, 2024, 19:50 PM IST

मुंबई : खुलता कळी खुलेना या मालिकेतून घरा-घरात पोहचलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे तिच्या पर्सनल आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिज्ञाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. काही वर्षापुर्वी तिने मेहून पैसोबत लग्नगाठ बांधली. सगळं काही छान सुरु असताना अचानक तिच्या पतीला कॅन्सरच निदान झालं. ही गोष्ट त्यांच्यासाठी किती कठिण होती याबद्दल या दोघांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितली आहे. पतीला कँसर आहे ही गोष्ट अभिज्ञाला लग्नाच्या अ‍ॅनिव्हर्सरीच्या दुसऱ्याच दिवशी कळाली होती. यानंतर तिची काय प्रतिक्रिया होती याबबत मेहूल पै ने भाष्य केलं आहे.

1/7

पाहूयात काय म्हणाला अभिनेत्रीचा पती

नुकतीच अभिज्ञा आणि मेहूल यांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना मेहूल पै म्हणाला, ''मी जितका प्रॅक्टिकल आहे तितकी ती नाहीये. त्यामुळेच जेव्हा अ‍ॅनिव्हर्सरीच्या दिवशी जेव्हा कँसरचं कळलं तेव्हा खरं सांगायचं तर मी जेव्हा रिपोर्ट घेतले. ''

2/7

डॉक्टरांना फोन केला

पुढे मेहुल म्हणाला ''हातात जेव्हा आले तेव्हाच मला कळलं की काहीतरी गडबड आहे यात. मी डॉक्टरांना फोन केला. ते मला म्हणाले की आपण दोन दिवसांनी बोलू. तेव्हाच मला कळलं होतं की काहीतरी गडबड आहे. ''  

3/7

'मी ते रिपोर्ट जरा लपवून ठेवले'

पुढे मेहुल म्हणाला ''पण अ‍ॅनिव्हर्सरीचा दुसरा दिवस होता. मी हिला काही बोललो नाही. घरी आलो. मी ते रिपोर्ट जरा लपवून ठेवले. हिला कळायला नको म्हणून. हिला काय झालं माहीत नाही. हिने ते रात्री शोधून काढले.'' 

4/7

आणि ती रात्री रडायला लागली...

पुढे मेहुल म्हणाला, ''ते चेक केले. गूगल केलं आणि ही रात्री रडायला लागली. मला उठवलं की हे काय आहे, मला सांगितलं का नाही वगरे.''

5/7

पण जेव्हा त्यावरचे उपाय सुरू झाले तेव्हा...

पुढे मेहुल म्हणाला, ''मी झोपलो होतो. मी म्हणालो, आता जे आहे ते आहे. आता काही करू तर नाही शकणार. पण जेव्हा त्यावरचे उपाय सुरू झाले तेव्हा तिच्यात कुठून ताकद आली माहीत नाही, पण तेव्हा तिला कळलं होतं की आता आपल्यालाच करायचंय.''

6/7

मला कुठे रडता येत नव्हतं, पण...

यावर अभिज्ञा म्हणाली, ''याच्या घरी चर्चा हा प्रकारचं नाहीये. त्यामुळे मला ते एवढं सफोकेट झालं होतं. मला कुठे रडता येत नव्हतं. पण नंतर मला कळलं की ते सगळे घरातलं वातावरण नीट ठेवण्याचा प्रयत्न करतायत.''

7/7

ते १० दिवस भयानकच होते

''मग मी स्वतःला सावरलं कारण मी जर तिथे रडले असते तर सगळंच अवघड झालं असतं. तेसुद्धा ढासळले असते. पण ते १० दिवस भयानकच होते.'' अशी चर्चा या दोघांनी दिलेल्या मुलाखतीत केली.