Irfan Pathan : पहिल्यांदा पत्नीचा चेहरा दाखवून ट्रोल झाला इरफान पठाण, 'इस्लाममध्ये…'

Irfan Pathan Reveals Wife Face : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू इरफान पठाण गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

| Feb 05, 2024, 16:42 PM IST

Irfan Pathan Wife : स्टार ऑलराऊंडर इरफान पठाणने नुकताच त्याच्या लग्नाचा आठवा वाढदिवस तीन फेब्रुवारीला साजरा केला.

1/6

पत्नीचा चेहरा दाखव

लग्नाचा वाढदिवशी पत्नीला शुभेच्छा देताना पठाणने प्रथमच सोशल मीडियावर पोस्ट करत पत्नीचा चेहरा दाखवला होता.

2/6

मूड बूस्टर पत्नी

अनेक पात्र एकाच व्यक्तीने साकारली आहेत. माझ्या मुलांसाठी मूड बूस्टर, कॉमेडियन, सोबती, मित्र आणि आई, असं वर्णन इरफानने त्याच्या पत्नीचं केलं होतं.

3/6

मला आनंद वाटतो...

आयुष्याच्या सुंदर प्रवासात तू माझी पत्नी म्हणून सोबत आहेस याचा खूप आनंद वाटतो, असं इरफान पठाण म्हणाला होता.

4/6

सफा बेग

मात्र, लग्नानंतर आठ वर्षानंतर इरफानने आपल्या पत्नीचा म्हणजेच सफा बेगचा चेहरा दाखवल्याने सोशल मीडियावर इरफान ट्रोल होताना दिसतोय.

5/6

इरफान पठाणला खडे बोल

काही चाहत्यांनी इस्लामचा उल्लेख करत इरफान पठाणला खडे बोल सुनावले आहेत. तर काहींनी सफा बेगची प्रशंसा केली आहे.

6/6

दोन मुलं

दरम्यान, 20 डिसेंबर 2016 रोजी इरफान आणि सफा यांच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला. तर डिसेंबर 2021 मध्ये त्यांना दुसरं मुल झालं होतं.