Photos: तीन बाईक्सवर 14 तरुणांचा वेगवान प्रवास; पोलिसांनी अशाप्रकारे उतरवली स्टंटबाजी करणाऱ्यांची मस्ती

14 People Riding on 3 Bikes in Full Speed: तीन बाईक्सवरुन हे 14 तरुण प्रचंड वेगाने प्रवास करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले. हे व्हिडीओ स्थानिक स्तरावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग आली.

Jan 13, 2023, 11:35 AM IST

सोशल मीडियावर या तरुणांच्या स्टंटबाजीचा व्हिडीओ व्हायरल झाला. तीन बाईकवर 14 जण अत्यंत वेगाने प्रवास करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. पोलिसांनी या तरुणांना चांगलाच धडा शिकवला आहे.

1/5

14 People Riding on 3 Bikes in Full Speed bikes seized by UP Bareilly Police

उत्तर प्रदेशमधील बरेली येथील काही तरुणांनी जीवावर उदार होत बाईकवर स्टंटबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन बाईकवर एकूण 14 तरुण प्रवास करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली.

2/5

14 People Riding on 3 Bikes in Full Speed bikes seized by UP Bareilly Police

यापैकी एका बाईकवर सहा तरुण प्रवास करत होते तर अन्य दोन बाईक्सवर प्रत्येकी चार तरुण प्रवास करत होते. हे सर्वजण फार वेगाने बाईक पळवत होते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओची दखल पोलिसांनी घेतली असून या तरुणांची मस्ती उतरवली आहे.

3/5

14 People Riding on 3 Bikes in Full Speed bikes seized by UP Bareilly Police

सध्याच्या सर्दीच्या कालावधीमध्ये सामान्यपणे बाईकवरुन प्रवास करणंही शक्य नसताना हे तरुण स्टंटबाजी करण्याची हिंमत कशी करु शकतात असा प्रश्न या तरुणांची स्टंटबाजी पाहणाऱ्यांना पडला आहे.

4/5

14 People Riding on 3 Bikes in Full Speed bikes seized by UP Bareilly Police

बरेलीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार चौरसीया यांनी या मुलांविरोधात कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं आहे. "आम्हाला यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर या तरुणांच्या बाईक जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरु असून पुढील कारवाईही केली जाणार आहे," असं चौरसीया म्हणाले.

5/5

14 People Riding on 3 Bikes in Full Speed bikes seized by UP Bareilly Police

अनेकांनी या मुलांनी केलेली ही स्टंटबाजी बावळटपणा असल्याचं मत नोंदवलं आहे. अनेकांनी एएनआय या वृत्तसंस्थेनं पोस्ट केलेल्या फोटोंवर कमेंट करुन या मुलांना झापलं आहे. प्रसिद्ध होण्यासाठी आजकाल तरुण काहीही करत असतात, हा त्यातलाच प्रकार आहे असं अनेकांनी म्हटलं आहे.