तुम्हाला टायपिंग येतं का? मुंबई महानगरपालिकेत मिळू शकते नोकरीची संधी...

BMC : मुंबई महानगरपालिकेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे

Feb 05, 2023, 18:51 PM IST
1/7

BMC Post

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्युनियर स्टेनोग्राफर कम रिपोर्टर (इंग्रजी आणि मराठी) पदासाठी 27 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

2/7

bmc stenographer

ज्युनिअर स्टेनोग्राफर वृत्तनिवेदक (इंग्रजी) या पदासाठी एकूण 9 जागा रिक्त आहे. यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

3/7

marathi typing

तसेच इंग्रजी टायपिंगचा वेग 40 शब्द प्रति मिनिट तर इंग्रजी शॉर्टहॅण्डचा वेग 80 शब्द प्रति मिनिट इतका असणे आवश्यक आहे.

4/7

bmc english

ज्युनियर स्टेनोग्राफर कम रिपोर्टर (मराठी) या पदासाठी एकूण 18 जागा रिक्त आहेत. या पदांसाठीही उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

5/7

bmc mararthi

तसेच उमेदवाराच्या मराठी टायपिंगचा वेग हा 30 शब्द प्रति मिनिट आणि मराठी शॉर्टहॅण्डचा वेग हा 80 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे. यासोबतच दोन्ही पदांसाठी MSCIT चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

6/7

bmc exam age limt

खुल्या प्रवर्गातील  18 ते 38 वर्ष वय असणारे उमेदवार अर्ज करु शकतात. तर मागासवर्गीय प्रवर्गातील 18 ते 43 वय वर्ष असणारे उमेदवार अर्ज करु शकतात.

7/7

BMC website

उमेदवाराने  http://www.mcgm.gov.in या अधिकृत वेबसाईटवरुन अर्ज घेऊन तो पूर्णपणे भरुन हानगरपालिका सचिव ह्यांचे कार्यालय, खोली क्रमांक 100, पहिला मजला, विस्तारित इमारत, महापालिका मार्ग, मुंबई -400001 या पत्त्यावर पाठवायचा आहे.