Shiv Jayanti 2023 : शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा; 35 फुटांची भव्य रांगोळी

शिवजयंती 2023 निमित्ताने कोपरगाव येथे छत्रपची शिवाजी महाराज यांची 35 फुटांची भव्य रांगोळी.

Feb 18, 2023, 16:41 PM IST

कुणाल जमदाडे, झी मीडिया, कोपरगाव : 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती (Shiv Jayanti 2023) उत्सव साजरा होत आहे. यानिमित्ताने शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले आहे. 35 फुटांच्या भव्य रांगोळीच्या माध्यमातून महाराजांना मानाचा मुजरा देण्यात आला आहे. कोपरगाव येथे ही रांगोळी काढण्यात आली आहे. 

1/5

 शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना या साकारलेल्या रांगोळ्या पाहण्यासाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. 

2/5

पोहेगाव ग्रामस्थांच्या वतीने गावात प्रथमच रांगोळी काढण्यात आली आहे.

3/5

जिथे औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना कैद केले त्याच दिल्लीतील आग्रा किल्ल्यात शिवजयंती धुमधडाक्यात साजरी होणार आहे.

4/5

शिवसैनिकांचं लक्ष वेधून घेणारी 35 फुटांची रांगोळी साकारण्यात आली आहे. ही रांगोळी काढण्यासाठी  ३ दिवस  लागले आहेत.

5/5

कोपरगाव तालुक्यातील पोहेगावात शिवजयंती उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे.