Photos: 200 कॅरेट हिरे, 350 Kg गुलाब पाकळ्या अन्..; बुर्ज खलिफात भारतीयाचं लग्न! टाटा, बिर्ला, अंबानी नाही तर..

Ultra Lavish Indian Dubai Wedding At Burj Khalifa: मुकेश अंबानी आणि निता अंबानींच्या मुलाचं लग्न मागील काही महिन्यांपासून चर्चेत असतानाच आता दुबईमध्ये पार पडलेलं एक आलिशान लग्न अचानक चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे या लग्न सोहळ्याचा अंबानी, टाटा, बिर्ला यासारख्या बड्या कुटुंबांशी काहीही संबंध नाही. जाणून घेऊयात या लग्नाबद्दल आणि पाहा खास फोटो...

| Aug 26, 2024, 08:22 AM IST
1/14

japinderkaurharpreetsingh

अंबानींच्या लग्नाची जोरदार चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरु होती. भारतामधील सर्वात महागडं लग्न म्हणून देशातच नाही तर जगभरातील प्रसारमाध्यमांचं लक्ष या लग्नाने वेधून घेतलं. गुजरातमधील जामनगरमधील पहिल्या सर्वाजनिक कार्यक्रमापासून ते अगदी अनंत अंबानी आणि राधिक मर्चंड यांच्या हनिमूनपर्यंत सगळ्याच गोष्टींची प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा झाली. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण एका भारतीयाचं दुबईत झालेलं लग्न हे अंबानींचं लग्नही सामान्य वाटेल अशा थाटात पार पडलं. या लग्नातील बरीकसारीक गोष्टींमधूनही श्रीमंती झळकत होती असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.  

2/14

japinderkaurharpreetsingh

खरं तर हे लग्न 2017 मध्ये पार पडलं होतं आणि ते ही दुबईमध्ये! मात्र या लग्नातील भारतीयपणा टिकवून ठेवण्याचा पूरेपूर प्रयत्न करण्यात आला. (Image Credit: The Wedding Salad)  

3/14

japinderkaurharpreetsingh

दुबईमधील फॅशन डिझायनर जापिंदर कौर आणि उद्योजक हरप्रीत सिंग चड्ढा हे दोघांचं लग्न जवळपास पाच दिवस सुरु होतं. (Image Credit: The Wedding Salad)  

4/14

japinderkaurharpreetsingh

दुबईमधील तीन आलिशान ठिकाणी या पाच दिवसांमध्ये या लग्न सोहळ्याचे वेगवेगळे सोहळे पार पडले. जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफाबरोबरच बुर्ज अल अरब जुमेरा आणि प्लाजो व्हरसॅसी दुबई येथे हे सोहळे पार पडले. (Image Credit: The Wedding Salad)

5/14

japinderkaurharpreetsingh

वऱ्हाडामधील सर्वच आलीशान गाड्यांना फुलांची सजावट करण्यात आली होती. (Image Credit: The Wedding Salad)

6/14

japinderkaurharpreetsingh

जापिंदर कौर आणि हरप्रीत सिंग चड्ढा दोघांनी याचवरील एका सोहळ्यामध्ये तब्बल 350 किलो गुलाबाच्या पाकळ्या वापरल्या होत्या. (Image Credit: The Wedding Salad)  

7/14

japinderkaurharpreetsingh

जापिंदर कौर आणि हरप्रीत सिंग या दोघांवर याचमध्ये असताना हेलिकॉप्टरमधून गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आलेला. (Image Credit: The Wedding Salad)  

8/14

japinderkaurharpreetsingh

याचवरही भव्य सोहळा पार पडला. त्यापूर्वी समुद्रामधील आलिशान याच सजवण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या वर घेऊन जाण्यासाठीही हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली होती. (Image Credit: The Wedding Salad)  

9/14

japinderkaurharpreetsingh

साखरपुड्याला जापिंदर कौरला हरप्रीतने 12 कॅरेट हिऱ्याची अंगठी घातली. तर जापिंदर कौरने हरप्रीतला 6 कॅरेटच्या हिऱ्याची अंगठी घातली. (Image Credit: The Wedding Salad)

10/14

japinderkaurharpreetsingh

जापिंदरने साखरपुड्यासाठी 20 पौंड वजनाचा लेहंगा परिधान केला होता. (Image Credit: The Wedding Salad)

11/14

japinderkaurharpreetsingh

जापिंदरनेने 120 कॅरेटचा पोलकी नेकलेसही घातला होता. तर रोका सेरिमनीसाठी जापिंदरने स्वरोस्की कंपनीची महागडी ज्वेलरी परिधान केली होती. (Image Credit: The Wedding Salad)

12/14

japinderkaurharpreetsingh

जापिंदरनेने डोक्यावर हिऱ्याचा मुकूटही घातला होता. (Image Credit: The Wedding Salad)

13/14

japinderkaurharpreetsingh

समोर आलेल्या माहितीनुसार, जापिंदर कौर आणि हरप्रित चड्ढा यांनी केलेल्या लग्नाचा खर्च हा 600 कोटी रुपये इतका होता. (Image Credit: The Wedding Salad)

14/14

japinderkaurharpreetsingh

जापिंदर कौर आणि हरप्रीत सिंग यांच्या लग्नाचा हा खर्च सध्याचा अंबानींनी केलेल्या खर्चापुढे फिका वाटेल पण दरम्यान गेलेला कालावधी आणि एकंदरितच त्यावेळी या दोघांनी लग्न करताना केलेलं सेलिब्रेशन पाहिलं तर हा लग्न सोहळा नक्कीच उठून दिसणार आहे यात शंका नाही. (Image Credit: The Wedding Salad)