49 वर्षीय अभिनेता 20 वर्षीय अभिनेत्रीला करतोय डेट? पार्टीतला फोटो Viral; Ex-Wife म्हणाली, 'ती आमच्या मुलीपेक्षा..'

49 Year Old Actor Dating 20 Year Old Actress Ex Wife Reacts: सोशल मीडियावर या दोघांचे एका पार्टीमधील फोटो व्हायरल झाल्यानंतर दोघं डेट करत असल्याची तुफान चर्चा असून यावर आता या अभिनेत्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीनेही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

| Jul 14, 2024, 11:10 AM IST
1/16

Maguire beach lily chee Dating

हॉलिवूडमधील स्पायडर मॅन चित्रपटामध्ये पीटर पार्करची भूमिका साकारणारा अभिनेता टोबी मग्वायर सध्या 4 जुलै म्हणजेच अमेरिकेच्या स्वातंत्र दिनानिमित्त आयोजित पार्टीमुळे चर्चेत आहे.

2/16

Maguire beach lily chee Dating

हा 49 वर्षीय अभिनेता या पार्टीमध्ये 20 वर्षीय अभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या लिली ची सोबत दिसून आला. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.  

3/16

Maguire beach lily chee Dating

न्यूयॉर्कमधील हॅम्पटन्स येथे 4 जुलै रोजी 'फॅनटॅस्टीक'चे मुख्य कार्यकारी अधिकारी माचेल रुबीन यांनी आयोजित केलेल्या स्वातंत्र्यदिन विशेष पार्टीत लिली ची आणि टोबी मग्वायर या दोघांना एकत्र पाहून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत का अशी शंका उपस्थित केली जात आहे.

4/16

Maguire beach lily chee Dating

अभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या लिली ची हिने या पार्टीमध्ये अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.  

5/16

Maguire beach lily chee Dating

विशेष म्हणजे या पार्टीमध्ये लिली आणि टोबी दोघेही पांढऱ्या कपड्यांमध्येच आले होते. लिलीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या अनेक मैत्रीणीही दिसत आहेत.  

6/16

Maguire beach lily chee Dating

लिलीने काही खास पोज देत पार्टीमधील फोटो स्वत:च्या इनस्टाग्राम अकाऊंटला टाकले आहेत.  

7/16

Maguire beach lily chee Dating

लिलीचे पार्टीमधील फोटो सध्या चर्चेत असले तरी तिचं टोबी मग्वायरबरोबरचं कथित अफेरही चर्चेत असून यावर टोबीच्या आधीच्या पत्नीनेही प्रतिक्रिया दिली आहे.   

8/16

Maguire beach lily chee Dating

खरं तर लिली ही मूळची चिनी असली तरी ती अमेरिकेमध्येच लहानाची मोठी झाली आहे. वयाच्या 10 व्या वर्षापासून ती मॉडेलमध्ये काम करते.  

9/16

Maguire beach lily chee Dating

लिलीचे इन्स्टाग्रामवर 15 लाख 83 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.  

10/16

Maguire beach lily chee Dating

लिली अनेकदा स्वत:च्या मॉडेलिंग फोटोशूटबरोबरच भटकंतीचे फोटो या अकाऊंटवरुन पोस्ट करत असते.  

11/16

Maguire beach lily chee Dating

लिली तिच्या फोटोशूट आणि भटकंतीच्या फोटोंमुळे तशी चाहत्यांमध्ये कायमच चर्चेत असते.

12/16

Maguire beach lily chee Dating

अर्थात लिली आणि टोबी यांनी याबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नोंदवली नसली या कथित कपलमधील वयाचा फरक चर्चेत आहे. टोबी हा 49 वर्षांचा असून लिली 20 वर्षांची आहे.  

13/16

Maguire beach lily chee Dating

विशेष म्हणजे लिली आणि टोबीने यावर प्रतिक्रिया दिली नसली तरी टोबीची पूर्वाश्रमीची पत्नी जेनिफर मेयर या कथित जोडप्यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.  

14/16

Maguire beach lily chee Dating

"तुझा नवरा तुमच्या मुलीपेक्षा 3 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्री मागे का लागलाय?" अशी कमेंट एका चाहत्याने केलेली त्यावर जेनिफर मेयरने प्रतिक्रिया नोंदवली आहे.  

15/16

Maguire beach lily chee Dating

"सामान्यपणे मी या असल्या फालतू गोष्टींवर प्रतिक्रिया देत नाही. मात्र तो केवळ त्याच्या मैत्रिणीला कारपर्यंत सोडायला गेला होता. तो सभ्या पुरुषासारखा वागत होता," असं जेनेफर म्हणाली.  

16/16

Maguire beach lily chee Dating

"तो तिला कारपर्यंत सोडायला गेल्याने ते दोघे डेट करत असल्याचं म्हणत त्याच्यावर ऑनलाइन टीका होत आहे. मात्र तुझ्या या उद्धट कमेंटसाठी धन्यवाद. ही कमेंट करुन तुला बरं वाटलं असेल. तुझा दिवस उत्तम जावो. तुला फार सारं प्रेम," असं जेनिफर मेयर म्हणाली आहे.