टेस्ट सामन्यात या ५ गोलंदाजांच्या बॉलवर कोणताच फलंदाज सिक्स मारू शकला नाही

Jul 29, 2020, 21:32 PM IST
1/5

डेरेक प्रिंगल

डेरेक प्रिंगल

इंग्‍लंचा महान खेळाडू डेरेक प्रिंगल यांनी त्यांच्या करिअरमध्ये सुरुवातील फलंदाजी देखील केली. पण त्यांनी गोलंदाजीमध्ये देखील मोठे कारनामे करुन दाखवले. प्रिंगल यांनी आपल्या करिअरमध्ये एकूण ३० सामने खेळले. त्यांनी ५२८७ बॉल टाकले आणि ७० विकेट घेतल्या. पण त्यांच्या बॉलवर देखील कोणी सिक्स मारु शकलेलं नाही. (फोटो-Twitter/@derekpringle)  

2/5

मुदस्‍सर नजर

मुदस्‍सर नजर

पाकिस्‍तानकडून खेळणारे मुदस्‍सर नजर यांनी एकूण ७६ टेस्ट सामने खेळले. ५८६७ बॉल त्यांनी टाकले पण एकाही बॉलवर सिक्स लागला नाही. (फोटो-Twitter/@TheRealPCB)

3/5

मोहम्‍मद हुसैन

मोहम्‍मद हुसैन

पाकिस्‍तानचे माजी गोलंदाज मोहम्‍मद हुसैन यांनी १९५२ मध्ये क्रिकेला सुरुवात केली. त्यांनी २७ टेस्ट सामने खेळले. पण त्यांच्या बॉलवर कोणीची सिक्स मारु शकलं नाही. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये 5,910 बॉल टाकले आणि ६८ विकेट घेतल्या. (फोटो -Twitter/@TheRealPCB)

4/5

कीथ मिलर

कीथ मिलर

ऑस्‍ट्रेलियाचे माजी गोंलदाज कीथ मिलर यांनी आपल्या करिअरमध्ये ५५ टेस्‍ट सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी १०४६१ बॉल टाकले आहेत. त्यांनी त्याच्या टेस्ट करिअरमध्ये १७० विकेट ही घेतल्या आहेत. पण त्यांच्या बॉलवर कोणीची सिक्स मारु शकलेलं नाही. (फोटो -Wisden)

5/5

नील हॉक

नील हॉक

माजी गोंलदाज नील हॉक यांनी ऑस्‍ट्रेलियाकडून २७ टेस्‍ सामने खेळले आहेत. या दरम्याने त्यांनी 6,987 बॉल टाकले पण त्यांच्या बॉलिंगवर कोणताचा फंलदाज सिक्स मारु शकला नाही. (फोटो-Twitter/@ICC)