शरीरात पाण्याची कमतरता झाल्यावर दिसतात 5 लक्षण, इग्नोर केल्यास वाढेल हार्ट अटॅकचा धोका

शरीरात पाण्याच्या कमतरतेचा वाईट प्रभाव हा त्वचा किंवा बॉडी डिटॉक्सिफिकेशनवरचं नाही तर हृदयावरही पडू शकतो. कमी पाणी पिण्याच्या सवयीमुळे तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे हार्ट अटॅक सारख्या समस्या उद्भवू शकतात. पाण्याच्या कमतरतेचा परिणाम हा सरळ हृदयाच्या आरोग्यावर पडतो. ज्यात हृदय आणि त्याच्या कार्डियोवॅस्कुलर सिस्टमचा समावेश आहे.  

Aug 18, 2024, 19:29 PM IST
1/5

हृदयाचे ठोके अनियमित होणे :

शरीरात इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन ठेवण्यासाठी पुरेश्या पाण्याची आवश्यकता असते. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा इलेक्ट्रोलाइट्स असंतुलित होतात ज्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊन थेट हृदयावर परिणाम होतो. 

2/5

ब्लड फ्लो कमी होऊ लागतो :

पाण्याच्या कमतरतेमुळे रक्त घट्ट होऊ शकते, ज्यामुळे ब्लड फ्लो हळू होतो. रक्त घट्ट झाल्यावर हृदयाला ते पंप करण्यासाठी जास्त प्रेशर द्यावे लागते. ही स्थिती हाय ब्लड प्रेशर आणि हृदयाशी निगडित अन्य समस्यांसाठी कारणीभूत ठरते. 

3/5

शरीराचं तापमान असंतुलित होते :

पाणी शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी मदत करत. पाण्याच्या कमतरतेने शरीराचे तापमान असंतुलित होऊ शकते, ज्यामुळे हृदयावर दबाव वाढू शकतो . असे अधिकतर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये होते. 

4/5

किडनी आणि हृदयाचा एकमेकांशी संबंध :

शरीरात पाण्याची कमतरता झाली किडनी संबंधित समस्या निर्माण होतात. तसेच किडनी आणि हृदय एकमेकांशी निगडित असल्याने किडनीला काही अपाय झाल्यास त्याचा प्रभाव हा हृदयावर सुद्धा पडतो.

5/5

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)