आता फोटोग्राफरची गरजच नाही; 50 MP चा सेल्फी कॅमेरा आणि बरचं काही; Vivo ने लाँच केला जबरदस्त स्मार्टफोन

  Vivo V40 Series चे फिचर्स आणि किंमत जाणून घेऊया.

| Aug 07, 2024, 21:44 PM IST

Vivo V40 Series Launch in India : व्हिवो कंपनीने Vivo V40 स्मार्टफोन Series भारतात लाँच केली आहे. या फोनमध्ये तब्बल 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला. यामुळे सेल्फीची आवड असणाऱ्यांसाठी हा फोन बेस्ट फोन ठरणार आहे. 

1/7

Vivo कंपनीने  नवी Vivo V40 Series भारतात लाँच केली आहे.  Vivo V40 Pro आणि Vivo V40 असे हे दोन नविन फोन आहेत. 

2/7

Vivo V40 च्या 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 34,999 रुपये आहे.  8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 36,999 रुपये इतकी आहे. तर, 12GB RAM + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 41,999 रुपये आहे. हा फोन ब्लू, लोटस पर्पल आणि टायटॅनियम ग्रे रंगात उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा फोन 19 ऑगस्टपासून खरेदी करता येणार आहे. 

3/7

Vivo V40 Pro दोन कॉन्फिगरेशनमध्ये येतो.  8GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 49,999 रुपये आहे. तर 12GB RAM + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 55,999 रुपये इतकी आहे. हा फोन निळा आणि टायटॅनियम ग्रे रंगात उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 13 ऑगस्टपासून याची  विक्री  सुरू होणार आहे.   

4/7

 Vivo V40 Series च्या फोनमध्ये  50MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यासह या फोनमध्ये 50MP वाइड अँगल लेन्स आणि 50MP टेलिफोटो लेन्स कॅमेरा देण्यात आला आहे. 

5/7

Vivo V40 Series चे फोन Android 14 वर आधारित Funtouch OS 14 वर काम करतात.  या फोनमध्ये 5500mAh क्षमतेचा दमदार बॅटरीबॅकअप देण्यात आला आहे.   

6/7

या फोनच्या प्रो व्हेरियंटमध्ये MediaTek Dimensity 9200+ प्रोसेसर देण्यात आले आहे. तर स्टँडर्ड व्हेरियंटमध्ये Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे.

7/7

Vivo V40 Series चे फोन Vivo V30  Series चे अपडेटेड व्हर्जन आहे. यामुळे या नव्यचा फोनमध्ये कंपनीने अधिक लेटेस्ट आणि दमदार फिचर्स दिले आहेत.