50 हजार हिऱ्यांची अंगठी; मुंबईच्या ज्वेलर्सची Guinness World Record मध्ये नोंद

मुंबईच्या ज्वेलर्सची Guinness World Record मध्ये नोंद झाली आहे. 50 हजार पेक्षा जास्त हिऱ्यांचा वापर करत ही अंगठी घडवण्यात आली आहे. 50 हजार पेक्षा हिरे जडित या अंगठीने नवा इतिहास रचला आहे. या अंगठीने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. याची किंमत 6.42 कोटी रुपये इतकी आहे. 

May 02, 2023, 17:48 PM IST

Guinness World Record : मुंबईच्या ज्वेलर्सची Guinness World Record मध्ये नोंद झाली आहे. 50 हजार पेक्षा जास्त हिऱ्यांचा वापर करत ही अंगठी घडवण्यात आली आहे. 50 हजार पेक्षा हिरे जडित या अंगठीने नवा इतिहास रचला आहे. या अंगठीने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. याची किंमत 6.42 कोटी रुपये इतकी आहे. 

1/7

मुंबईच्या एचके डिझाईन आणि हरी कृष्णा एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ने जगातील सर्वात जास्त हिरे असलेली अंगठी घडवली आहे. 

2/7

याआधी ऑक्टोबर 2020 मध्ये, हैदराबादच्या हॉलमार्क ज्वेलर्सने फुलांच्या आकाराची अंगठी घडवली होती. या अंगठीत 7801 हिरे होते. तर, मेरठ, उत्तर प्रदेशच्या रेनानी ज्वेलर्सने एका घड्याळावर सर्वाधिक 17,524 हिरे बसवण्याचा विक्रम रचला होता. 

3/7

सर्वात जास्त हिरे असलेल्या या अंगठीची Guinness World Record मध्ये नोंद झाली आहे. 

4/7

या अंगठीचे डिजाईन कंप्युटरवर तयार करण्यात आले. यासाठी चार महिने लागले. तर, ही अंगठी प्रत्यक्षात घडवण्यासाठी कारागीरांना नऊ महिने लागले. 

5/7

11 ते 14 मे दरम्यान  स्विट्जरलँड मधील GemGeneve प्रदर्शात ही अंगठी ठेवली जाणार आहे. 

6/7

या सोन्याच्या अंगठीचे वजन 460.55 ग्रॅम इतके आहे. तर,  हिऱ्याचे वजन 130.19 कॅरेट आहे. 

7/7

या अंगठीत एकूण 50,907 हिरे आहेत.