700 गाड्या, 4 हजार कोटींचा राजवाडा अन्... 'हे' आहे जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब

Al Nahyan Royal Family : जेव्हा भारतीय लोक प्रचंड संपत्ती आणि श्रीमंत कुटुंबांचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात अंबानी आणि अदानी यांचीच नावे येतात. पण  जगात एक राजघराणे असंही आहे ज्याची संपत्ती या लोकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.  नुकतीच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी समोर आणली ज्यामध्ये दुबईच्या अल नाह्यान या राजघराण्याचे नाव अग्रस्थानी आले. एकूण 56 लोकांचे हे खूप मोठे कुटुंब आहे. या कुटुंबाची लक्झरी जीवनशैली अनेकदा चर्चेत असते. 

Jan 19, 2024, 15:37 PM IST
1/8

Wealth of the Al Nahyan Royal Family of Dubai

दुबईच्या अल नाहयान रॉयल फॅमिलीची संपत्ती तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल. या कुटुंबाकडे 4,078 कोटी रुपयांचा भव्य राजवाडा आहे. तसेच त्यांच्याकडे 8 खाजगी जेट आणि एक प्रसिद्ध फुटबॉल क्लब देखील आहे.

2/8

President Sheikh Mohammed bin Zayed Al Nahyan

शेख मोहम्मद हे अबुधाबीचे 17 वे अमीर आणि शासक आहेत. 11 मार्च 1961 रोजी जन्मलेल्या शेख मोहम्मद यांनी ब्रिटनच्या रॉयल मिलिटरी अकादमी सँडहर्स्टमधून पदवी प्राप्त केली. 2003 मध्ये त्यांना अबुधाबीचे उपयुवराज म्हणून नियुक्त करण्यात आले.

3/8

President Sheikh Mohammed bin Zayed Al Nahyan wife

1981 मध्ये, त्यांनी राजकुमारी सलामाशी लग्न केले आणि हे इतिहासातील सर्वात मोठे शाही लग्न मानले जाते. त्यांच्या लग्नासाठी त्यांनी एक स्टेडियम बांधले होते, जिथे सात दिवस भव्य समारंभ आयोजित करण्यात आला होता. या विवाहासाठी 20,000 पाहुणे उपस्थित होते आणि त्यासाठी 100 दशलक्ष डॉलर खर्च आला.

4/8

MBZ Family

संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान आहेत, ज्यांना MBZ म्हणूनही ओळखले जाते. नाहयन यांना 18 भाऊ आणि 11 बहिणी आहेत. अमिराती राजघराण्याला नऊ मुले आणि 18 नातवंडेही आहेत.

5/8

mbz Oil reserves

या कुटुंबाकडे जगातील सहा टक्के तेलसाठा आहे. याशिवाय, त्यांची मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लब आणि गायक रिहानाचा ब्युटी ब्रँड फेंटी ते एलोन मस्कच्या स्पेस एक्ससह अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये भागीदारी आहे.

6/8

Sheikh Hamad bin Hamdan Al Nahyan car

राष्ट्रपतींचे धाकटे भाऊ शेख हमद बिन हमदान अल नाहयान यांच्याकडे 700 हून अधिक कार आहेत. यामध्ये पाच Bugatti Veyron, Lamborghini Reventon, Mercedes-Benz CLK GTR, Ferrari 599XX आणि McLaren MC12 सोबत जगातील सर्वात मोठी एसयूव्ही गाड्या आहेत.

7/8

Qasr Al-Watan Presidential

या कुटुंबातील लोक अबुधाबीमध्ये सोन्याने बनवलेल्या कसर अल-वतन प्रेसिडेंशियल पॅलेसमध्ये राहतात. संयुक्त अरब अमिरातीमध्ये असलेल्या अशा अनेक राजवाड्यांपैकी हा सर्वात मोठा आहे. हा महाल सुमारे 94 एकरमध्ये पसरलेला आहे. मोठ्या घुमटाच्या राजवाड्यात 350,000 स्फटिकांनी बनवलेले एक भव्य झुंबर आणि अमूल्य ऐतिहासिक कलाकृती आहेत.

8/8

Sheikh Mohammed bin Zayed Al Nahyan is one of London richest landlords

शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची लंडनमधील सर्वात श्रीमंत जमीनदारांमध्ये गणना केली जाते. शेख यांच्या नावावर लंडनमध्ये एक-दोन नव्हे तर अनेक इमारती आहेत.