7th pay commission: रेल्वेत नोकरीची संधी

रेल व्हील फॅक्ट्रीमध्ये  (Rail Wheel Factory Recruitment 2020) भरती सुरु होणार आहे. या विभागाकडून स्पोर्ट्स कोट्यातून भरती सुरु केली जात आहे. यासाठी उमेदवार २४ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करु शकतात. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत भरती सुरु होणार आहे. 

Feb 03, 2020, 13:52 PM IST

यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २० जानेवारीपासून सुरु झाली आहे. याबाबत रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवरुन अधिक माहिती घेता येऊ शकते.

1/4

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला ५०० रुपये खर्च येणार आहे. अर्जासाठी ऍप्लिकेशन फी म्हणून ५०० रुपये भरावे लागणार आहेत. एससी SC, एनटी NT उमेदवारांना केवळ २५० रुपये ऍप्लिकेशन फी भरावी  लागणार आहे. 

2/4

या व्हॅकेन्सीसाठी, कमीत-कमी १८ आणि जास्तीत जास्त २५ वय वर्ष असणारा उमेदवाराचं अर्ज भरु शकतो. वयाची गणना १ जुलै २०१९च्या आधारे करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे. यासाठी १०वी पास असणं आणि त्याशिवाय आयआयटीची डिग्री असणं गरजेचं आहे. स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत ही भरती असणार आहे.  

3/4

यासाठी ऑफलाईन अर्जही करता येणार आहे. त्यासाठी https://rwf.indianrailways.gov.in/  या लिंकवर क्लिक करा. उमेदवाराला निळ्या रंगाच्या बॉलपेनने स्वत:च्या हस्ताक्षरात आवश्यक ती माहिती भरावी लागेल. हिंदी आणि इंग्रजी कोणत्याही भाषेचा वापर करता येऊ शकतो.

4/4

भरतीबाबत अधिक माहितीसाठी https://rwf.indianrailways.gov.in/works/uploads/files/Misc/PersonnelDept/Notifications/Sports%20quota/Sports%20Quota%20Notification%202019-20%20II.pdf  या लिंकवर क्लिक करा.