चित्रपटसृष्टी पासून लांब झालेल्या बॉलिवूड अभिनेत्री

Aug 02, 2020, 14:36 PM IST
1/10

मीनाक्षी शेषाद्री

मीनाक्षी शेषाद्री

निर्भया प्रकरणाच्या आधी ‘दामिनी प्रकरण चर्चेत आलं होतं. जेव्हा कोणत्याही मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या तेव्हा तिला दामिनी हे नाव दिलं जात होतं. सनी देओल सोबत घायल, घातक आणि दामिनी, अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘शहंशाह’ आणि ‘गंगा जमुना सरस्वती’, अनिल कपूर यांच्यासोबत ‘मेरी जंग’ आणि ‘जोशीले’ तर जॅकी श्रॉफ सोहतृ ‘हीरो’ सारखे सुपरहिट सिनेमे तिने केले. ‘पेंटर बाबू’ पासून तिने सिनेमांना सुरवात केली. 1995 मध्ये इनवेस्टमेंट बँकर हरीश मैसोर सोबत तिने विवाह केला आणि टेक्सासमध्ये शिफ्ट झाली. तेथे ती भरत नाट्यम, कत्थक शिकवते.

2/10

किमी काटकर

किमी काटकर

हेमंत बिरजे सोबत ‘टारजन’ सिनेमा करणारी किमी काटकर एक बी ग्रेड हॉट सींस करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जावू लागली. `हम` मध्ये अमिताभ बच्चन सोबत तिने ‘जुम्मा चुम्मा दे दे’ गाणं केलं. हे गाणं गाजलं. पण अचानक तिने फिल्ममेकर आणि फोटोग्राफर शांतनु शोरे सोबत विवाह केला. त्यानंतर ती सिनेमांपासून लांबच राहिली. तिच्या 9 वर्षाच्या मुलाला पोटाचा कॅन्सर असल्याचं कळाल्यानंतर ती त्याच्या उपचारासाठी ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाली. त्यानंतर आता ती कुटुंबासोबत गोव्यात राहते.

3/10

नेहा

नेहा

चोरी चोरी नजरें मिलीं, चोरी चोरी दिल ने कहा... ‘करीब’ सिनेमातील या गाण्याने तिने प्रसिद्धी मिळवली. नेहाच्या नावाने तिला ओळखलं जावू लागलं. पण तिचं खरं नाव शबाना रजा होतं. विधु विनोद चोपडाने बॉबी देओल सोबत लॉन्च करताना तिचं नाव नेहा केलं होतं. नेहाने मनोज बाजपेयी सोबत विवाह केला. 2009 मध्य ‘एसिड फॅक्ट्री’ सिनेमात तिने काम केलं होतं. पण त्यानंतर ती कुटुंबाला वेळ देत आहे.

4/10

नीलम कोठारी

नीलम कोठारी

नीलम कोठारी ‘लव 86 सिनेमातून चर्चेत आली. 1986 मध्ये आलेल्या या सिनेमात बॉलिवूडचे 3 कलाकार चर्चेत आले. गोविंदा, तब्बू्ची बहिण फराह नाझ आणि नीलम कोठारी. नीलम-गोविंदा या जोडीने हत्या, इल्जाम सारखे 14 सिनेमे केले. हाँगकाँगमध्ये जन्माला आलेली गुजराती असलेली नीलमच्या कुटुंबाचा दागिन्यांचा व्यवसाय होता. त्यानंतर ती बँकॉकला शिफ्ट झाली. मुंबईत ती आली तेव्हा तिला ‘जवानी’ सिनेमाची ऑफर मिळाली.  2000 साली तिचं लग्न यूकेमधील बिझनेसमन ऋषि सेठिया यांच्यासोबत झालं. पण त्यांचं नातं टिकलं नाही. त्यानंतर समीर सोनी सोबत तिने विवाह केला. 2013 मध्ये त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली. सलमान खान सोबत जोधपूर काळवीट शिकार प्रकरणात तिचं देखील नाव आल्याने ती चर्चेत आली. सिनेमांमध्ये काम करण्याचं सोडल्यानंतर तिने आपल्या कुटुंबाचा बिझनेस सांभाळला. ‘नीलम ज्वैल्स’ नावाने तिने ब्रांड लॉन्च केला.

5/10

भाग्यश्री

भाग्यश्री

भाग्यश्री सांगलीची राजकुमारी होती. तिचे वडील राजा होते.  कच्ची धूप’ सीरियलपासून तिचं करिअर सुरु झालं. सलमान सोबत‘मैंने प्यार किया’ सिनेमातून तिने सिनेमात काम करायला सुरुवात केली. पहिलाच सिनेमा हिट ठरला. पण नंतर तिने लग्न केलं. अनेक जण सिनेमांची ऑफर घेऊन तिच्या समोर उभे होते. पण तिची अट अशी होती की, सिनेमा करेल तर तिचा पती हिमालय दासानी सोबतच, इतर कोणताही हिरो नाही चालणार. दोघांनी काही सिनेमे केले पण ते फ्लॉप ठरले. त्यानंतर तिला इंडस्ट्रीमध्ये काम मिळालं नाही. कधी मराठी सिनेमे, कधी बंगाली सिनेमांमध्ये तिने काम केलं.  सीआयडी मध्ये देखील ती झळकली. झलक दिखला जा 3 मध्ये ती स्पर्धक होती. ती स्वत:ला अजूनही फीट ठेवते. सोशल मीडियावर सक्रिय असते. मुलगा अभिमन्यु दासानीला अभिनेता करण्यासाठी प्रयत्न करत आहे. ‘मर्द को दर्द नहीं होता’ या सिनेमात त्याने काम देखील केलं आहे.

6/10

ग्रेसी सिंह

ग्रेसी सिंह

ग्रेसी सिंह छोट्या सिरीअल करत होती. आमिर खान आणि आशुतोष गोवारीकर यांची नजर तिच्यावर गेल्यानंतर अचानक तिचं नशीब उजळलं. ‘लगान’ सिनेमात काम मिळालं. भुवन की राधा हे गाणं घराघरात गाजलं. भरतनाट्यम आणि ओडिसीची ट्रेंड डांसर ती होती. मुन्ना भाई एमबीबीएस आणि गंगाजल सिनेमात तिने काम केलं. पण त्यानंतर केआरकेच्या सिनेमात ती दिसली. त्यानंतर एंड टीवीवर संतोषी मांच्या भूमिकेत ती सध्या काम करते आहे.

7/10

ममता कुलकर्णी

ममता कुलकर्णी

ममता कुलकर्णी आणि वाद हे समीकरण कधी संपलंच नाही. एका पोलिसाची मुलगी चित्रपटसृष्टीमध्ये आल्यानंतर अनेक सिनेमे तिला ऑफर झाले. तिरंगा, करण अर्जुन, सबसे बडा खिलाडी, चायना गेट सारखे मोठे सिनेमे तिने केले. पण राजकुमार संतोषी यांच्यासोबत तिचा वाद झाला.‘चायना गेट’ सिनेमातील ‘छम्मा छ्म्मा’ हे गाणं ममताच्या ऐवजी उर्मिला मातोंडकरला मिळाल्याने हा वाद झाला होता. विक्रम गोस्वामी सोबत लग्न केल्यानंतर ती भारतातून दुसऱ्या देशात स्थायिक झाली.

8/10

फरहीन

फरहीन

फरहीनने ‘जान तेरे नाम’ मध्ये रोनित रॉय सोबत 1992 मध्ये डेब्यू केला होता. तिच्या लुकमुळे तिला दुसरी माधुरी म्हटलं जावू लागलं होतं. त्यानंतर तिला रजनीकांत यांचा ‘कलिंगन’ सिनेमा ऑफर झाला आणि तिने शाहरुखच्या बाजीगर सिनेमाला नकार दिला. त्यानंतर ‘नजर के सामने’ सिनेमात ती दिसली. पण आज ही अभिनेत्री दिल्लीतील क्रिकेटर मनोज प्रभाकर यांच्यासोबत मोठा हर्बल बिझनेस चालवत आहे. तसेच ती त्यांचं कुटुंब देखील सांभाळत आहे. मनोज प्रभाकर यांनी पहिल्या पत्नीला डिवॉर्स दिल्यानंतर फरहीनसोबत लग्न केलं. तिला २ मुलं देखील आहे.

9/10

रागेश्वरी

रागेश्वरी

रागेश्वरीला लोकं तेव्हा ओळखू लागले जेव्हा ती ‘आंखें’ सिनेमात झळकली. गोविंदा आणि चंकी पांडे सोबत रितु शिवपुरी आणि रागेश्वरी यांनी काम केलं होतं. या सिनेमात दोन्ही नव्या अभिनेत्रींना लॉन्च केलं गेलं होतं. रागेश्वरी दिसायला सूंदर होती पण ती आता सध्या सिनेमांपासून लांब आहे. ‘मैं खिलाड़ी तू अनाड़ी’, अक्षय, सैफ आणि शिल्पा शेट्टी सोबत तिने काम केलं होतं. ती सिंगर आणि मॉडल होती. अनेक शो तिने होस्ट केले होेते. 2000 साली चंद्रचूड प्रमाणे तिच्यासोबतही तशीच घटना घडल्यानंतर तिला पॅरालिसिसची समस्या उद्भवली. यातून बाहेर पडण्यासाठी अनेक वर्ष गेली. 2003 मध्ये अभिषेक बच्चनच्या ‘मुंबई से आया मेरा दोस्त’ मध्ये ती एका रिपोर्टरच्या भूमिकेत दिसली होती. 2011 च्या `बिग बॉस`मध्ये देखील ती दिसली.

10/10

उदिता गोस्वामी

उदिता गोस्वामी

उदिता गोस्वामी देहरादून येथून मुंबईला आली. ती एक मॉडल होती. पेप्सी, टायटन सारखे ब्रांड देखील तिला आपल्या जाहिरातीत घेण्यासाठी मागे लागले होते. एमटीवीची मॉडल कॉन्टेस्ट जिंकल्यानंतर तिला प्रत्येक जण ओळखू लागला होता. सगळ्यात आधी पूजा भट्टने तिला संधी दिली. ‘पाप’ सिनेमात 2003 मध्ये तिने सुपर हॉट सिनेमात काम केलं. जॉन अब्राहम सोबत ती मुख्य भूमिकेत होती. येथे तिची भेट महेश भट्ट यांच्या जवळचे मोहित सूरीसोबत झाली. ज्यांना आपल्या सिनेमात अभिनेत्री हवी होती. मोहितने त्यांच्या डेब्यू सिनेमा ‘जहर’मध्ये इमरान हाशमी सोबत काम करण्याची संधी तिला दिली. डिनो मोरिया सोबत तिने अक्सर’ सिनेमात काम केलं. मोहित सूरी सोबत अफेअरच्या चर्चा झाल्यानंतर दोघांनी लग्न केलं. सध्या ती बॉलिवूडपासून लांब आहे. 2012 मध्ये तिचा शेवटचा सिनेमा ‘डायरी ऑफ ए बटरफ्लाई’.रिलीज झाला होता.