वाळवंटात उत्खननात सापडले 4,500 वर्ष जुने सूर्यमंदिर, पाहा अप्रतिम फोटो

Nov 18, 2021, 19:04 PM IST
1/5

अबू गोराब येथे सापडलेल्या सूर्यमंदिरात मातीने भरलेल्या अनेक भांडी देखील सापडल्या आहेत, जे 4500 वर्षांपूर्वीच्या शिल्पकलेचा नमुना आहे. (फोटो क्रेडिट्स- MCPR)

2/5

सूर्यमंदिराचा पाया मातीच्या विटांचा असल्याचे पुरातत्व शास्त्रज्ञांना तपासादरम्यान समोर आले. ज्यावरून या जागेवर आधीच इमारत असल्याचे दिसून आले. (फोटो क्रेडिट्स- MCPR)

3/5

इजिप्तच्या उत्तरेकडील भागात उत्खननादरम्यान, पुरातत्वशास्त्रज्ञांना सूर्य मंदिराचे अवशेष सापडले. हे सूर्यमंदिर ईसापूर्व २५ व्या शतकात बांधले गेले. (फोटो क्रेडिट्स- MCPR)

4/5

द सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सूर्याचे हे मंदिर 4,500 वर्षांपूर्वी इजिप्शियन राजा फारोने बांधले होते. दुसरीकडे, या मंदिराजवळ राजाचे अंतिम विश्रामस्थान म्हणून पिरॅमिड बांधण्यात आले होते जेणेकरून मृत्यूनंतर राजाला पुन्हा देव म्हणून पुर्नजन्म घेता येईल. (फोटो क्रेडिट्स- MCPR)

5/5

पुरातत्वशास्त्रज्ञांना वाळवंटात गाडलेले 4,500 वर्षे जुने सूर्य मंदिर सापडले आहे. वाळवंटात खाणकाम करताना शास्त्रज्ञांना सूर्य मंदिराचा शोध लागला. इजिप्तची राजधानी कैरोजवळील अबू गोराब शहरात पुरातत्वशास्त्रज्ञांना एक जुने सूर्य मंदिर सापडले आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांचा गेल्या काही दशकांतील सर्वात मोठा शोध म्हणून याचे वर्णन केले जात आहे.