Shiv Jayanti 2023 : बळीराजाकडून मानाचा मुजरा! गव्हाच्या पेरणीतून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा

हिरव्यागार शिवारात साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा. शिवजंयती निमित्ताने (Shiv Jayanti 2023) बळीराजाकडून महाराजांना अनोखी मानवंदना. 

Feb 19, 2023, 15:55 PM IST

कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : राज्यभरात शिवजंयतीचा (Shiv Jayanti 2023) उत्साह पहायला मिळत आहे. सर्वत्र  छत्रपती शिवाजी महाराज जयंती जल्लोषात साजरी होत आहे. अशातच बळीराजाकडून महाराजांना अनोखी मानवंदना देण्यात आली आहे. अहमदनगरमध्ये गव्हाच्या पेरणीतून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा साकारली आहे. 

 

1/6

छत्रपती शिवाजी महाराज यांची  प्रतिमा बघण्यासाठी नागरीक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. 

2/6

कुणाल यांच्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

3/6

या गव्हाच्या शेतीतून कुणाल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची 24 × 18 फुटांची भव्य प्रतिमा साकारली आहे. 

4/6

यासाठी महिनाभरा पुर्वी कुणाल विखे यांनी गव्हाची पेरणी केली होती. 

5/6

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी प्रवरानगर येथील कुणाल विखे या युवक शेतकऱ्याने महाराजांना अनोखी मानवंदना दिली आहे. 

6/6

गव्हाच्या पेरणीतून  छत्रपती शिवरायांची प्रतिमा साकारली आहे.