महाराष्ट्रातील रहस्यमयी विहीर; 8 बाजूने चक्राकार पद्धतीने फिरत तळाशी जाणाऱ्या पायऱ्या पाहून डोकं चक्रावतं

विहीच्या पायऱ्यांचा आकार नदीतील पाण्याच्या भोवर्‍याप्रमाणे दिसतो. ही विहीर पाहून डोळे फिरतात. 

| May 24, 2024, 19:10 PM IST

Parbhani Walur Barav Helical Stepwell : महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम रचना असलेल्या विहीरी आहेत. यापैकी एक आहे ती  परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील वालूर गावात असलेली वेलूर बारव अर्थात वेलूरची पायविहीर. या विहीरीची रचना अतिशय गूढ आहे.

1/7

परभणीत महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी विहीर आहे. ; 8 बाजूने चक्राकार पद्धतीने फिरत विहीच्या तळाशी जाणाऱ्या पायऱ्या पाहून डोकं चक्रावतं.

2/7

 32.2 फूट लांब, 30.8 फूट रुंद आणि 32 फूट खोल अशी या विहीरीची रचना आहे. अशा प्रकारे ही विहीर का बांधण्यात आली याचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही.  

3/7

या विहीच्या पायऱ्यांचा आकार नदीतील पाण्याच्या भोवर्‍याप्रमाणे फिरत्या स्वरूपाचा भासतो. यामुळे विरीहीत डोकावून पाहताना तसेच विहीहीर उतरताना डोळे गरगरतात. 

4/7

 या विहीराची रचना अतिशय गूढ आहे. वालूर गावाला तंत्रविद्येची पार्श्वभूमी आहे. यामुळे या विहीरीच्या बांधकामावर याचा प्रभाव दिसून दितो. 

5/7

या विहीरीच्या बांधकामात 8 आकाड्याची कमाल पहायला मिळते. आठ बाजूने विहीरीत उतरणार्‍या पायर्‍या, आठ देवकोष्ट अशी याची रचना आहे.   

6/7

 बांधकाम शैलीनुसार आणि वैशिष्ट्यपूर्ण रचनेनुसार सुमारे एक ते दीड हजार वर्षांपूर्वी या बारवचे बांधकाम करण्यात आल्याचे इतिहासतज्ञ सांगतात. 

7/7

 परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील वालूर या गावी असलेली बारव अर्थात पायविहीर ही तिच्या बांधकाम वैशिष्ट्यामुळे केवळ देशातीलच नव्हे तर जगातील आश्चर्यकारक वस्तू ठरली आहे.